मुंबई, पुण्यात 3 नवे रुग्ण; महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर

मुंबई, पुण्यात 3 नवे रुग्ण; महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर

जे रुग्ण दाखल करण्यात आले आहे, त्यातील काही रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. आज मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक असे आणखी 3 रुग्ण आढळून आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली. कोरोना आजार बरा होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. जे रुग्ण दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल, पण त्यांना होम क्वारांटाइन राहावे लागेल, अशी दिलासादायक माहिती टोपे यांनी दिली.

मात्र, महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई, पिंपरी आणि पुण्यात आणखी 3 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ही 52 वर पोहोचली आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना अंतर्गत उपचार दिले जातात, त्यामुळे रुग्णावर खर्चाचा आर्थिक ताण वाढणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू करण्याचे आवाहन केलं आहे. त्यांचा हा निर्णय योग्य आहे. त्याला शंभर टक्के प्रतिसाद दिला पाहिजे, जनतेनी सहभाग घेतला पाहिजे, असं आवाहनही टोपेंनी केलं.

तसंच आज पंतप्रधान मोदी यांच्या समवेत आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री व्हिडीओ काॅन्फरन्स करणार आहेत. राज्यात काय परिस्थिती असून केंद्र सरकारकडून टेस्ट लॅब, किटस याबाबत काही मागणी राज्य सरकार करेल, अशी माहितीही टोपेंनी दिली.

महाराष्ट्रातील 3 तरूण इराणमध्ये बोटीवर अडकले

दरम्यान, 'कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे इराणमधील अबादान बंदरातील बोटीमधून बाहेर पडण्यास मज्जाव केल्यामुळे ठाण्यातील एका तरुणासह महाराष्ट्रातील तिघे जण बोटीवरच अडकले आहेत. या बोटीवरील अन्य देशांतील उर्वरित 30 कर्मचाऱ्यांची संबंधित देशांकडून सुखरुप सुटका करण्यात आली.

दरम्यान, या तरुणांची सुटका करण्यात यावी, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.

आखातातील अमिर बोटीवर महाराष्ट्रातील विवेक विष्णू माळकर राहणार किसननगर, सौरभ शशिकांत पिसाळ रा. भांडुप आणि अॅंथोनी जॉन पॉल रा. कोल्हापूर अशा तिघांसह 33 कर्मचारी कार्यरत होते.

इराणमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अबादान बंदरातील बोटीवरील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास तडकाफडकी बंदी घालण्यात आली.

त्यामुळे 8 दिवसांपासून अमिर बोट गोदीतच तळ ठोकून आहे. दरम्यानच्या काळात बोटीवरील 30 कर्मचाऱ्यांची संबंधित देशांकडून सुटका करण्यात आली. मात्र, आता भारतातील तिघे कर्मचारी अडकले आहेत.

यात ठाण्यातील किसननगर, भांडूप आणि कोल्हापुरातील तरुणाचा समावेश आहे. या तरुणांची बोटीतून सुटका करण्यासाठी इराणमधील भारतीय राजदूतांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

दरम्यान, किसननगरमधील तरुणांच्या पालकांची निरंजन डावखरे यांनी आज भेट घेतली. तसेच त्यांना दिलासा दिला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनाही पत्र पाठवून विवेक माळकर यांच्या कुटुंबीयांनी मदतीची विनंती केली आहे.

First published: March 20, 2020, 11:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या