Home /News /mumbai /

CBIला महाराष्ट्रात आता ‘नो एन्ट्री’, चौकशीसाठी घ्यावी लागेल आता सरकारची परवानगी

CBIला महाराष्ट्रात आता ‘नो एन्ट्री’, चौकशीसाठी घ्यावी लागेल आता सरकारची परवानगी

या निर्णयामुळे राज्यात तपास करण्याआधी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. या आधी पश्चिम बंगालने असा निर्णय घेत सीबीआयला अटकाव केला होता.

  नवी दिल्ली 21 ऑक्टोबर: केंद्र सरकारच्या Central Bureau of Investigation (CBI) या चौकसी संस्थेला महाराष्ट्रात आता थेट तपास करता येणार नाही. राज्यात चौकशीसाठी येण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर CBI थेट राज्यात येवून चौकशी करू शकते. मात्र त्यासंदर्भात काही अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. त्याचाच वापर करत राज्य सरकारने सीबीआयच्या अधिकारांना कात्री लावली आहे. या निर्णयामुळे राज्यात तपास करण्याआधी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. या आधी पश्चिम बंगालने असा निर्णय घेत सीबीआयला अटकाव केला होता. त्यावरून तिथे प्रचंड वादही झाला होता. स्थानिक पोलिसांनी चौकशीसाठी आलेल्या सीबीआय आधिकाऱ्यांना अटक केली होती. महाराष्ट्रातही सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीवरून प्रचंड वादळ निर्माण झालं होतं. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने चौकशी केली नाही त्यामुळे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची परवानगी दिली होती. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये तणावही निर्माण झाला होता. सीबीआयचं पूर्ण नियंत्रण हे केंद्र सरकारच्या हातात असल्याने कायम राज्य आणि केंद्रात वाद निर्माण होतात. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकार सीबीआयचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप कायम विरोधकांकडून करण्यात येत असतो. यावरून अनेकदा सुप्रीम कोर्टानेही सीबीआयला फटकारलं होतं. या निर्णयामुळे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: CBI

  पुढील बातम्या