22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेली सर्व तूर खरेदी करणार - मुख्यमंत्री

22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेली सर्व तूर खरेदी करणार - मुख्यमंत्री

तूर खरेदीसंदर्भात सरकारची आडमुठी भूमिका, नोटाबंदीनंतर आता तूरबंदीचा जाच

  • Share this:

25 एप्रिल : तूर खरेदी केंद्रावर आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्यांची तूर 5 हजार 50 रुपये या हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

व्यापाऱ्यांकडे तुरीला साडे तीन ते चार हजार रुपये भाव आहे. मात्र, सरकार नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 5 हजार 50 रुपये हमीभावाने तूर खरेदी करणार आहे. यासाठी एक हजार कोटी रुपये अधिकचे उपलब्ध करून देण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्यांनी मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी आणली आहे. त्यांच्या शेतीची सॅटेलाईट मॅपिंग करून ती त्यांचीच तूर आहे का, याची तपासणी केली जाईल. तेवढं पीक न आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

यूपीए सरकारच्या काळात 2011-12 साली नाफेडने बोनस देऊन सुद्धा फक्त 20 हजार टन तूर खरेदी झाली होती. ज्याचे पैसे 9 महिन्यानंतर दिले, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 02:56 PM IST

ताज्या बातम्या