Home /News /mumbai /

अजित पवारांचा यू टर्न; वेतन कपातीचा निर्णय मागे, सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत मिळणार वेतन

अजित पवारांचा यू टर्न; वेतन कपातीचा निर्णय मागे, सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत मिळणार वेतन

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन एकाच टप्प्यात दिले जाते.

    मुंबई, 31 मार्च : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन कमातीच्या निर्णयावरून राज्य सरकारने आता यू-टर्न घेतला आहे. आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला असून मार्च महिन्याचं वेतन दोन टप्प्यांत देण्यात येणार आहे. कर्मचारी नाराजी नको यासाठी धडाकेबाज अजित पवारांनाही एक पाऊल मागे घ्यावं लागल्याची चर्चा आहे. मात्र यावेळी वेतन कपातीला अजित पवार यांनी केंद्र सरकारला जबाबदार ठरवलं आहे. ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासननिर्णय जारी करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्प्यात मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला 300 पार, एकट्या मुंबईत वाढले 67 रुग्ण राज्याच्या वित्त विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यासाठी देय वेतनाच्या 50 टक्के रक्कम पहिल्या टप्यात मिळेल. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन पहिल्या टप्प्यात मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्तीधारकांना पूर्ण वेतन मिळेल. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. या सर्वांचे उर्वरीत वेतन दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारवर फोडले खापर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन एकाच टप्प्यात दिले जाते. परंतु, केद्राकडून राज्याला देय असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम मिळाली असती तर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन एकाचवेळी देणे शक्य झाले असते, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ठाण्यात अख्खं खासगी रुग्णालयच केलं क्वारंटाइन, कुणाला बाहेर जाता येणार नाही कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून त्यांच्या वेतनात कपात करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. कोरोनाविरोधात लढणाऱ्या शासकीय यंत्रणेचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले असून यासंदर्भात कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्यात मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही लिहिलं होतं पत्र 'महाराष्ट्र सरकारने वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला असला तरी अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनात एकही रूपयाची कपात करू नये,ही कळकळीची विनंती! कोरोनाविरूद्धच्या लढाईत अतिरिक्त वेळ, श्रम एवढेच काय,प्राणाची बाजी लावून ते काम करीत आहेत. त्याचे मनोबल उंचावण्याचे काम आपण करायला हवे. इतरही शासकीय कर्मचार्‍यांना सुद्धा अतिरिक्त काम करावे लागत असल्याने त्यांनाही पूर्ण वेतन मिळावे, अशी विनंती मी करतो. त्यासोबतच मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्या वेतनात कपात करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो,' अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. कोरोना : मुंबई तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर? युद्धपातळीवरील उपाययोजनांचा आढावा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या