Unlock : राज्यात जिम सुरू होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

Unlock : राज्यात जिम सुरू होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

जिम सुरु करतांना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.

  • Share this:

मुंबई 28 ऑगस्ट: राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी सादर करावीत असं सांगण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्या सूचनांच्या आधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

मुंबईतील जिम चालकांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जिम सुरु करतांना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईतील जिम चालकांचे प्रतिनिधी महेश गायकवाड, निखिल राजपुरिया, करन तलरेजा, हेमंत दुधवडकर, गुरुजितसिंग गांधी, योगिनी पाटील, साईनाथ दुर्गे, रमेश गजरीया, मनोज पाटील उपस्थित होते.

कोरोनावरचं ‘स्पुतनिक-V’ हे औषध घेतल्यानंतर पुतीन यांच्या मुलीचं  काय झालं?

राज्यात शुक्रवारी पुन्हा एकदा 14 हजार 364  नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 14 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये 331 जणांची भर पडली आहे. तर 11 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्यू दर हा 3.16 टक्यांवर आला आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 47 हजार 995 एवढी झाली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 28, 2020, 7:46 PM IST
Tags: jim

ताज्या बातम्या