LIVE NOW

LIVE अपडेट : जनादेशाचा अनादर केला म्हणूनच राष्ट्रपती राजवट - भाजप

राज्यात सत्ता स्थापनेचा गोंधळ काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाही. भाजप, शिवसेना यांना सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी 24 तासांची मुदत दिली आहे. पण त्याआधीच राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. या शिफारसीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून आता त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होण्याची औपचारिकता शिल्लक आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून सत्ता स्थापनेसंदर्भातील चर्चा सुरु आहेत.

Lokmat.news18.com | November 12, 2019, 8:49 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 12, 2019
auto-refresh

Highlights

Load More
राज्यात सत्ता स्थापनेचा गोंधळ काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाही. भाजप, शिवसेना यांना सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी 24 तासांची मुदत दिली होती. पण त्याआधीच राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. या शिफारसीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसह राज्यात 1980 आणि 2014 नंतर पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून सत्ता स्थापनेसंदर्भातील चर्चा सुरु आहेत.