Home /News /mumbai /

'क्वारंटाइन'सेंटर्समध्ये आता CCTV आणि महिला पोलीस तैनात करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

'क्वारंटाइन'सेंटर्समध्ये आता CCTV आणि महिला पोलीस तैनात करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील प्रत्येक गावांत आता कोविड दक्षता समिती स्थापन करणार असल्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई 18 जुलै: राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सर्व राज्यातला आढावा घेण्यात आला. या बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी कोरनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. प्रत्येक गावात आता COVID दक्षता समित्या स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णयही सरकारने घेतला आहे. महिला रुग्णांसाठी महिला पोलिस सुरक्षा तैनात करणार असून सेंटर्समध्ये सीसीटीव्हीही लावण्यात येणार आहे. पनवेल मधल्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. टोपे म्हणाले, या बैठकीत राज्यातल्या कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. सगळी परिस्थिती लक्षात घेऊन काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात राज्यात यापुढे लॉकडाऊनची वेळ न आणता टप्या टप्याने दैनंदिन व्यव्हार सुरळीत कसे होतील याकडे सरकारचा कल असेल. राज्यात आता जिल्हा स्तरावर जसे टास्क फोर्स आहेत तसेच आता डेथ ऑडिट किमीटी निर्माण करणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक गावांत आता कोविड दक्षता समिती स्थापन करणार असल्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे ST महामंडळात कर्मचारी कपात; परिवहन मंत्र्यांनी केला मोठा खुलासा पनवेल क्वारंटाईन सेंटर मधील घटना दूर्दैवी असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस सुरक्षा वाढवणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच महिला रुग्णांसाठी महिला पोलिस सुरक्षा तैनात करणार असून सेंटर्समध्ये सीसीटीव्हीही लावण्यात येणार आहे. Coronavirus ची दहशत राज्यात (Maharashtra coronavirus updates) कायम आहे. कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच 1 लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस खाली येत असला, तरी या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे. VIDEO: भारत पाकिस्तान सीमेवर जवानांचा भांगडा, जोश पाहून सेहवागचंही बल्ले बल्ले! आज राज्यात तब्बल 8348 नव्या रुग्णांची भर पडली. तर 144 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,00,937वर गेली आहे. तर एकूण मृत्यू 11596 एवढे झाले आहेत. तर मुंबईत आज 1186 नवे रुग्ण आढळले तर 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 1,00,350 एवढी झाली. तर आत्तापर्यंत 5650 जणांचा मृत्यू झाला.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Uddhav thackarey

पुढील बातम्या