मुंबई, 13 जानेवारी: प्रवाशांचे टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांशी नेहमीच वाद होत असतात. त्यामुळे आता मुंबईत प्रवाशांच्या सोयीकरिता टॅक्सींवर तीन रंगाचे दिवे लागणार आहेत. लाल, हिरवा आणि सफेद रंगाचे हे दिवे असणार आहेत. या संदर्भातच परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. काय आहे या रंगांचं तंत्र?