Home /News /mumbai /

फडणवीस आणि ठाकरेंमध्ये प्रतिष्ठेचा मुद्दा ठरलेला 'आरे कारशेड' प्रकल्प काय आहे?

फडणवीस आणि ठाकरेंमध्ये प्रतिष्ठेचा मुद्दा ठरलेला 'आरे कारशेड' प्रकल्प काय आहे?

दररोज उपनगरी लोकल लाईनमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या सोयीसाठी मेट्रोचे जाळे शहरात उभारण्यात येत आहे. मेट्रो 3 चा मार्ग (Metro 3) हा शहरातील मुख्य भागातून जाणार असल्यानं लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे

     मुंबई, 1 जूलै : राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 (Metro 3)   चे कारशेड आरे कॉलनीमध्येच (Aarey colony) होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वीच्य उद्धव ठाकरे सरकारनं आरे कॉलनींमध्ये होणारा हा प्रकल्प रद्द केला होता. त्यानंतर शिंदे सरकारनं पहिल्याच बैठकीत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारनं अ‍ॅडव्होकेट जनरलला या प्रकरणात कोर्टात बाजू मांडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईची लाईफलाईन, राजकारण्यांची प्रतिष्ठा दररोज उपनगरी लोकल लाईनमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या सोयीसाठी मेट्रोचे जाळे शहरात उभारण्यात येत आहे. मेट्रो 3 चा मार्ग हा शहरातील मुख्य भागातून जाणार असल्यानं लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे. पण दुर्दैवानं या प्रकल्पाच्या नियोजित कारशेडला गेल्या काही वर्षांपासून विरोधाला सामना करावा लागत आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात या मुद्यावरून आमने-सामने आले होते. आरे कॉलनीमध्ये कारशेड करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवसेनेनं सत्तेत राहून विरोध केला होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) त्यामध्ये आघाडीवर होते. आजवर काय घडले? सप्टेंबर 2019 -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरे कॉलनीच्या जंगलातील 2700 झाडं कापण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाला स्वयंसेवी संघटना, पर्यावरणवादी तसंच तेव्हा सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही विरोध केला. सप्टेंबर 2019 - आरे कॉलनीतील झाडे न तोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला निर्देश ऑक्टोबर 2019 - आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या विरोधातील सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या. आरेमध्ये कारशेड करण्याचा मार्ग न्यायालयाकडून मोकळा ऑक्टोबर 2019 - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून मध्यरात्री आरे कॉलनीतील वृक्षतोडीस सुरूवात, मोठ्या विरोधानंतर वृक्षतोड स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय नोव्हेंबर 2019 - आरेमधील कारशेड स्थगित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा डिसेंबर 2019 -  आरे कॉलनीतील कारशेडला विरोध करणाऱ्या  आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय,  मेट्रो 3 साठी कांजुरमार्गमध्ये कारशेड उभारण्याची सरकारची घोषणा सप्टेंबर 2020 - कांजुरमार्गमध्ये कारशेड उभारण्याच्या उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती 2021 - कारशेडच्या वादामुळे मेट्रो 3 प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन पूर्ण करण्यात अपयश एप्रिल 2022 - कांजुरमार्गमधील कारशेडचा वाद सामंजस्यानं सोडवण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना 30 जून 2022 - एकनाथ शिंदे सरकारच्या पहिल्याच बैठकीत मेट्रो 3 चे कारशेड पुन्हा एकदा आरे कॉलनीत करण्याचा निर्णय शिंदे सरकारचं भवितव्य रविवारी होणार निश्चित, Floor Test पूर्वीच निर्णायक परीक्षा एकनाथ शिंदे सरकारनं सर्वप्रथम कारशेडचा निर्णय घेतलाय. या निर्णायावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप आहे. सरकारच्या या निर्णयाला आगामी काळात विरोध होण्याची शक्यता आहे. ठाकरे-फडणवीस यांच्यातील या लढाईत मेट्रो 3 प्रकल्पाचा खर्च दिवसोंदिवस वाढतोय. त्याचा फटका सामान्य करदाते आणि लोकलच्या गर्दीत जीव मुठीत धरूण बसणारे तसंच रोजच्या ट्रॅफिक जामचा त्रास सहन करणाऱ्या मुंबईकरांना बसतोय.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Metro, Mumbai, Uddhav thackeray

    पुढील बातम्या