मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा प्रधान केली आहे. राज ठाकरे यांना याआधी Y प्लस दर्जाचीच सुरक्षा होती. पण मध्यंतरी राज्य सरकारने Y प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती.

महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा प्रधान केली आहे. राज ठाकरे यांना याआधी Y प्लस दर्जाचीच सुरक्षा होती. पण मध्यंतरी राज्य सरकारने Y प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती.

महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा प्रधान केली आहे. राज ठाकरे यांना याआधी Y प्लस दर्जाचीच सुरक्षा होती. पण मध्यंतरी राज्य सरकारने Y प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती.

मुबई, 13 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Mosque loud speaker sound) मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकेनंतर धमकीचे फोन (threaten call) आणि पत्र येत होते. त्यामुळे मनसे (MNS) नेत्यांकडून त्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु होती. अखेर मनसे नेत्यांची ही मागणी राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य केली आहे. महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा प्रधान केली आहे. राज ठाकरे यांना याआधी Y प्लस दर्जाचीच सुरक्षा होती. पण मध्यंतरी राज्य सरकारने Y प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती. अखेर राज्य सरकारने पुन्हा राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. राज्य सरकारडून देण्यात आलेल्या या सुरक्षेवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त करत राज्य सरकार थट्टा करत आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले?

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे याच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकार मनसेची थट्टा करत आहे आहे का? सुरक्षेत वाढ करण्याच्या नावाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत एक पोलीस आणि एक इन्स्पेक्टर वाढवला असल्याचा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

"मी राज्याच्या गृहमंत्र्यांना काही दोष देणार नाही. राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा. राज्य सरकारची एक समिती असते ही समिती कुणाला किती सुरक्षा पुरवायची याबाबतचा निर्णय घेते. या समितीत मुख्यमंत्री आणि आणखी एक-दोन जण असतात. राज ठाकरे यांची Z सेक्युरिटी होती. ती तुम्ही कमी करुन Y केली. मी गृहमंत्र्यांना भेटून पुन्हा Z दर्जाची सुरक्षा द्या म्हणून विनंती केली होती. पण आज मी जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा एक इन्स्पेक्टर आणि एक पोलीस दिला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरुय. सुरक्षा देऊच नका. सरकार म्हणून निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. तुम्ही सरकार म्हणून शपथ घेतात तेव्हा द्वेष करणार नाही, समानतेची वागणूक देऊ अशी शपथ घेतात. ज्यांना गरज नाही त्यांना प्रचंड सुरक्षा देवून ठेवली आहे. ज्यांना गरज आहे त्यांनाच का सुरक्षा दिली जात नाही? राज ठाकरे हा खुल्या दिलाचा माणूस आहे. जे पोटात आहे ते ओठात आहे. ते मनात काही ठेवत नाही", असं बाळा नांदगावकर म्हणाले.

("पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज)

राज ठाकरे यांनी गेल्या दीड महिन्यात औरंगाबाद, ठाणे आणि मुंबई इथे तीन सभा घेतल्या. त्यांच्या या तीनही सभा प्रचंड गाजल्या. त्यांच्या भाषणांमुळे महाराष्ट्राचं राजकारण अतिशय तापलं आहे. या दरम्यान राज ठाकरे यांना वारंवार धमकीचे फोन येत आहेत. तसेच त्यांना धमकीचे मेसेज येत आहेत. त्यामुळे बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली होती. याशिवाय महाराष्ट्र सरकारकडून जेव्हा राज ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती तेव्हा देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन सुरक्षा वाढण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांना पुन्हा Y प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंना केंद्र सरकार विशेष सुरक्षा पुरवणार?

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडल्यानंतर त्यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार ते 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या घोषणेच्यावेळी एक महत्त्वाची बातमी समोर आली होती. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. तसेच राज ठाकरेंना उत्तर प्रदेश सरकारकडूनही विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. आता राज ठाकरे यांना खरंच केंद्र सरकार सुरक्षा पुरवते का? ते आगामी काळात नक्कीच समोर येईल.

First published:

Tags: MNS, Raj Thackeray