• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Maharashtra Lockdown updates: ठरलं तर, राज्यात आज लॉकडाऊनची अधिकृत घोषणा होणार- सूत्रांची माहिती

Maharashtra Lockdown updates: ठरलं तर, राज्यात आज लॉकडाऊनची अधिकृत घोषणा होणार- सूत्रांची माहिती

Maharashtra Lockdown updates: महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे निश्चित झाले असून आज रात्रीपर्यंत शासनाकडून अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:
मुंबई, 13 एप्रिल: कोरोना विषाणूची (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government)कडून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) करण्याच्या हालचालींना गेल्या अनेक दिवसांपासून वेग आला आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने निश्चित केले आहे. या संदर्भात आज अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनची अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. मात्र प्रत्यक्षात लाँकडाऊनची अंमलबजावणी 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे. उद्या मध्य रात्री 12 वाजल्या नंतर राज्यात कडक लाँकडाऊनची अंलबजावणी सुरू होईल. यावेळी राज्यात लागू करण्यात येणाऱ्या 2.0 कडक लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्या नागरिकांना काय आणि कुठे दिलासा मिळनार हे आज जाहीर होणाऱ्या अधिसूचनेत जाहीर होईल.' ही अधिसूचना जाहीर होताच लॉकडाऊन कशा पद्धतीचा असेल? कुठल्या गोष्टींना परवानगी असेल? काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? या सर्व गोष्टींची उत्तरे नागरिकांना मिळतील. हे पण वाचा: 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, आज-उद्या CM घोषणा करतील- बाळासाहेब थोरात राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन करायचा की 21 दिवसांचा लॉकडाऊन करावा यावरुन अनेकांची मते वेगवेगळी होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाहीये असं म्हटलं होतं. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह इतरही नेत्यांची मते जाणून घेतली. ही बैठक पार पडल्यावर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स सोबत एक बैठक घेतली त्यानंतर एक नियमावली तयार करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यात कडक निर्बंधांसह मिनी लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, कडक निर्बंध लागू करण्यात आले असतानाही राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळेच आता राज्य सरकारने राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by:Sunil Desale
First published: