मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाचा धोका वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतले अनेक मोठे निर्णय

कोरोनाचा धोका वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतले अनेक मोठे निर्णय

जे नागरिक आजपासून परदेशातून मुंबईत येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल आणि नागपूर, पुणे आणि मुंबईत ठेवण्यात येईल.

जे नागरिक आजपासून परदेशातून मुंबईत येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल आणि नागपूर, पुणे आणि मुंबईत ठेवण्यात येईल.

जे नागरिक आजपासून परदेशातून मुंबईत येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल आणि नागपूर, पुणे आणि मुंबईत ठेवण्यात येईल.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 13 मार्च : कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. 'पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद करण्यात येतील. तसंच 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वगळता या दोन शहरांतील शाळा बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. जे नागरिक आजपासून परदेशातून मुंबईत येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल आणि नागपूर, पुणे आणि मुंबईत ठेवण्यात येईल. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तसंच हॉटेलमध्ये जाणंही टाळावं. सुदैवाने 17 जणांना गंभीर आजार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारच्या आदेशानंतर काय-काय बंद होणार? गर्दी टाळण्याचे आदेश मुंबई , नवी मुंबई , नागपूर , पुणे , पिंपरी चिंचवड  जिम, जलतरण तलाव बंद मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे परिसरातली थिएटर्स बंद राहतील धार्मिक , राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द जिल्हाधिकारी यांनी काही परवानगी दिली असेल तर ती रद्द करावी हेही वाचा- ‘कोरोना’ची माहिती घेण्यासाठी Link ओपन करताना सावधान, रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाउंट दरम्यान, राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. आता ही संख्या 17 वर गेली आहे अशी माहिती पुण्याचे आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पुण्यातल्या रुग्णांची संख्या 10वर गेली असून नागपूरातही आणखी दोन जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पुण्यात 311 जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. लोकांनी कुठलीही माहिती फॉरवर्ड करण्याआधी खात्री करावी. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. हेही वाचा- नागपुरात 'कोरोना'ची लागण झालेल्या रुग्णाची पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आतापर्यंत 8777 घरांचे सर्वेक्षण केलं आहे. ज्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यातल्या फक्त 24 जणांना रुग्णालयात ठेवण्यात आलं असून इतर सर्वांना घरीच एकांतात राहण्यास सांगण्यात आलं आहे अशी माहितीही आयुक्तांनी दिली. नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. काळजी घेणं हा त्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे असंही ते म्हणाले. पुणे विभागातील इतर चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधीच्या उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात नजीकच्या काळातील फॉरेन रिटर्न नागरिकांना कॉरनटाईन केलं जाणार आहे . त्यांना काही दिवस आयसोलेट राहण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती म्हैसकर यांनी दिली.
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus disease, Pune news, Uddhav thackeray

पुढील बातम्या