आधी ठरल्याप्रमाणे करा; राष्ट्रपती राजवट आल्यास शिवसेना जबाबदार नाही- संजय राऊत

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटणार असे वाटत असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाबाबत ठाम भूमिका घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 10:22 AM IST

आधी ठरल्याप्रमाणे करा; राष्ट्रपती राजवट आल्यास शिवसेना जबाबदार नाही- संजय राऊत

मुंबई, 06 नोव्हेंबर: राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटणार असे वाटत असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. बुधवारी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेने कोणत्याही प्रकारच्या तडजोडीला तयार नसल्याचे स्पष्ट केले.

राज्य विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 14 दिवस झाल्यानंतरही अद्याप सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. यासंदर्भात शिवसेनेने आतापर्यंत घेतलेली भूमिका पुन्हा एकदा सांगितली. भाजपकडून कोणत्याही प्रकारचा नवा प्रस्ताव येणार नाही किंवा आणि त्यांना नवा प्रस्ताव पाठवणार नाही. ठरल्या प्रमाणे करा, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. ज्या गोष्टींवर आधीच सहमती झाली आहे त्याच गोष्टी पुढे घेऊन चला. हाच एकमेव प्रस्ताव, असल्याचे राऊत म्हणाले.

भाजप सोबत मुख्यमंत्रिपदाबाबत सहमती झाली होती. ही सहमती आता नव्हे तर निवडणुकीच्या आधी झाली होती. त्यानुसारच युती झाली होती आणि आम्ही निवडणुक लढवली होती.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास आम्ही जबाबदार नाही

राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. यासंदर्भात विचारले असते राऊत म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याला शिवसेना जबाबदार असणार नाही. जर राज्यावर कोणी राष्ट्रपती राजवट थोपवण्याचा प्रयत्न कर असेल तो महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान असेल. असे काही झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर झालेला अन्याय असेल आणि तो अधर्माचा विजय ठरेल, असे राऊत म्हणाले.राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला आहे का यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यासंदर्भात आम्ही बघून घेऊ काय करायचे.

Loading...

मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा ही शेतकऱ्यांची इच्छा

महाराष्ट्रात सध्या इतरपण महत्त्वाचे प्रश्न आहेत. शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे राज्यातील विविध भागात जात आहेत. काल देखील उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. सर्व शेतकरी एकच मागणी करत आहेत की राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.

महत्त्वाचे मुद्दे

- महाराष्ट्र मध्ये इतर प्रश्न महत्वाचे आहेत शेतकरी सेनेकडे अपेक्षा ने पाहत आहेत उद्धव जी आणि आदित्य दौऱ्यावर आहेत

- निवडणूक आधी जे ठरलं होतं तो प्रस्ताव कायम

- नवीन कोणताही प्रस्ताव नाही

- मुख्यमंत्री पदावर सहमती निवडणूक आधी झाली होती त्यानुसार गटबंधन झालं

- कोणताही प्रस्ताव न येणार न जाणार

- राष्ट्रवादीच्या सोबत अडीज वर्षांचा प्रस्ताव आहे त्यावर विचारणा केली असता बघू म्हणाले

- राज्यावर राष्ट्रपती शासन आलं तर ते जनतेच्या जनादेशाचा अपमान असेल आणि ती अधर्माची बाब असेल

- राष्ट्रपती राजवट लागली तर त्याला आम्ही जवाबदार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 10:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...