25 वर्षे युतीत सडले तरी एकत्र लढले; भाजप-सेना सत्ता संघर्षावर पवारांची मिश्किल टिप्पणी

25 वर्षे युतीत सडले तरी एकत्र लढले; भाजप-सेना सत्ता संघर्षावर पवारांची मिश्किल टिप्पणी

राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर बोलण्यासारख काही नाही अशी मिश्किल टिप्पणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर: राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर बोलण्यासारख काही नाही अशी मिश्किल टिप्पणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. जनतेने युतीला कौल दिला आहे त्यामुळे भाजप -शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि राज्यातील अस्थैर्य दूर करावे, असे पवारांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बसणार असल्याचे पवारांनी सांगितले. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू असे देखील पवार म्हणाले.

आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. त्याच बरोबर सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोनवरून चर्चा केली होती. सकाळपासूनच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. संजय राऊत यांच्या भेटीबद्दल बोलताना पवारांनी सांगितले की, राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. राज्यसभेच्या आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा झाली. तसेच आज सकाळी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या भेटीसंदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा असे पवार म्हणाले. पण गडकरी यांची भेट ही रस्ते आणि विकासासाठी असते असेही पवार म्हणाले.

काय म्हणाले पवार

दिल्ली पोलिसांना मिळालेली वागणूक योग्य नाही

सर्व राज्यातील पोलिसांची परिस्थीती गंभीर

वकिलांनी सुबरीनं घ्यावं

दिल्लीतील आंदोलनाला केंद्र सरकार जबाबदार

राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे

विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी

अयोध्येच्या निर्णयानंतर जनतेने संयम पाळावा

निकाल काही लागला तरी कायदा हातात घेऊ नका

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बसणार

आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू

भाजप-सेनेने लवकरात लवकर सरकार स्थापन करावे

संजय राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते

राज्यसभेच्या अधिवेशनासंदर्भात राऊत यांच्याशी चर्चा केली

दोघांनी मिळून सरकार स्थापन करून अस्थैर्य दूर करावे

गडकरींची भेट ही रस्ते आणि विकास कामासाठी असते

राष्ट्रपती राजवट ही फक्त शिवसेनेला दाखवलेली भीती

काँग्रेसने काय निर्णय घेतला हे माहिती नाही

जनतेने युतीला कल दिला, त्यांनीच सरकार बनवावं

25 वर्ष युतीत सडले तरी एकत्र लढले

आमच्याकडे संख्याबळ असते तर सरकार बनवलं असतं

मी चार वेळा मुख्यमंत्री झालोय,आता तशी अजिबात इच्छा नाही

सत्ते बाबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ने एकत्र निर्णय घ्यावा

Published by: Akshay Shitole
First published: November 6, 2019, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading