फडणवीस सरकारसाठी आजची रात्र 'वैऱ्याची'.. SCच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

फडणवीस सरकारसाठी आजची रात्र 'वैऱ्याची'.. SCच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारकडे 30 तासांचा अवधी...

  • Share this:

मुंबई,26 नोव्हेंबर: राज्यात राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने स्थापन झालेल्या सरकारबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल दिला आहे. उद्या, 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या न्यायपीठाने दिले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारकडे 30 तासांचा अवधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बहुमतचाचणीचे मतदान गोपनिय न घेता ते लाइव्ह टेलिकास्ट करा, असे निर्देशही सरकारला देण्यात आले आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारकडे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी आपला महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

हे आहेत निकालातील महत्त्वाचे मुद्दे

- फडणवीस सरकारला उद्या आपले बहुमत सिद्ध करावे लागणार

- बुधवारी संध्याकाळी 5 वाजता होणार बहुमत चाचणी.

- बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारकडे 30 तासांची मुदत.

- गुप्त मतदान नको, लाईव्ह टेलिकास्ट करा... कोर्टाचे निर्देश

- बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा

- बहुमत चाचणीचं व्हिडीओ चित्रिकरण होणार.

- ओपन बॅलेट पद्धतीने होणार मतदान.

सुप्रीम कोर्टात काल काय घडलं?

- आज सकाळपर्यंत न्यायालयानं निर्णय राखून ठेवला

-कोर्टानं निर्णय राखून ठेवला . आज सकाळी साडेदहा वाजता न्यायालय निर्णय देणार

-हंगामी अध्यक्षामार्फत बहुमताची चाचणी मंगळवारी घेऊ नका - मुकुल रोहतगी

-मंगळवारी बहुमत चाचणी घेण्याची परवानगी देऊ नका - मुकुल रोहतगी

-राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून 54 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले - तुषार मेहता

-अजित पवारांनी दिलेले पक्ष 22 नोव्हेंबर रोजीचे आहे - तुषार मेहता

-बहुमतासाठी 3 पक्षांना वेळ दिली- मेहता

-9 नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांनी वाट पाहिली- तुषार मेहता, महाधिवक्ता

-राष्ट्रपती राजवट नको म्हणून फडणवीस यांना पाठिंबा, असं अजित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे - तुषार मेहता

-राष्ट्रपती राजवट जास्त दिवस रहायला नको, ही अजित पवारांची भूमिका - तुषार मेहता

-'मीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पक्षातील वाद आम्ही सोडवू,' अशी अजित पवारांची भूमिका - कोर्टात अजित पवारांचे वकिल

-या प्रकरणी सविस्तर सुनावणीची गरज- तुषार मेहता

-भाजपच्या वतीने मुकुल रोहतगी हे युक्तीवाद करत आहेत

-एक पवार आमच्या सोबत तर दुसरे विरोधात- रोहतगी

-इतर पक्षांनी आणि अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला- रोहतगी

-निवडणूक पूर्व मित्रांनी आमची साथ सोडली- रोहतगी

-बहुमत सिद्ध करण्याची तारीख कोर्ट ठरवू शकत नाही- रोहतगी

-राज्यपालांनी आधीच बहुमत सिद्ध करण्याची तारीख निश्चित केली- रोहतगी

-मुख्यमंत्र्यांकडे बहुमतासाठीचे संख्याबळ आहे का? कोर्टाची विचारणा

-बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 5 दिवस शिल्लक- रोहतगी

-कर्नाटकासारखा कोणताही अंतरिम निर्णय देऊ नका- रोहतगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2019 11:11 AM IST

ताज्या बातम्या