मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; तौत्के चक्रीवादळग्रस्तांना 252 कोटी रुपयांची मदत जाहीर

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; तौत्के चक्रीवादळग्रस्तांना 252 कोटी रुपयांची मदत जाहीर

Maharashtra Government declares 252 crore package: तौत्के चक्रीवादळग्रस्त नागरिकांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Maharashtra Government declares 252 crore package: तौत्के चक्रीवादळग्रस्त नागरिकांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Maharashtra Government declares 252 crore package: तौत्के चक्रीवादळग्रस्त नागरिकांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 27 मे: तौत्के चक्रीवादळा (tauktae cyclone)मुळे राज्यातील किनारपट्टीच्या भागात असलेल्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg)सह ठाणे, पालघर जिल्ह्यांत तौत्के चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) आर्थिक मदत जाहीर (financial help) केली आहे. राज्य मंत्रिमडळाच्या आज झालेल्या बैठकीतनंतर मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी याची माहिती दिली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, तौत्के चक्रीवादळग्रस्तांसाठी आज आम्ही 252 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार 72 कोटी रुपयांचा एकूण नुकसानीचा आकडा आला होता. त्यात राज्य सरकारने स्वत:च्या तिजोरीतून 180 कोटी रुपयांचे अधिकचे घालून मदत जाहीर केली आहे. लवकरच या मदतीचं वाटपही सुरू करण्यात येईल.

अशी देण्यात येईल मदत

घरांच्या नुकसानीसाठी

नैसर्गिक आपत्तीत घरे पुर्णत: क्षतीग्रस्त झाले असल्यास किंवा अंशत: पडझड झालेल्या (किमान 15% नुकसान) कच्च्या व पक्क्या घरांपैकी ज्या घरांचे छत क्षतीग्रस्त झाल्याने अथवा पत्रे/कौले/छत उडुन गेल्याने घरातील कपडे व घरगुती भाडयांचे/वस्तुंचे  नुकसान झाले आहे अशा प्रकरणी कपडे तसेच घरगुती भांडी / वस्तुंकरिता अर्थ सहाय्य प्रति कुटुंब रू. 5000 कपडयांच्या नुकसानीसाठी आणि प्रति कुटुंब रू.5000 घरगुती भांडी/वस्तु नुकसानीसाठी. पूर्णत: नष्ट झालेल्या  झालेल्या  पक्क्या व कच्च्या  घरांसाठी मदत रू.1,50,000 प्रति घर आणि अंशत: पडझड झालेल्या (किमान 15 टक्के)  पक्क्या/कच्च्या घरांसाठी  मदत रू.15,000 प्रति घर तसेच अंशत: पडझड झालेल्या (किमान 25 टक्के)  पक्क्या / कच्च्या घरांसाठी मदत रू.25,000 प्रति घर आणि अंशत: पडझड झालेल्या (किमान 50 टक्के)  पक्क्या /कच्च्या घरांसाठी मदत रू.50,000 प्रति घर. नष्ट झालेल्या झोपडीपैकी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपडयांना मदत रू. 15,000 प्रति झोपडी अशी मदत देण्यात येईल.

पिकांच्या नुकसानीसाठी

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत- बहुवार्षिक पिके- रू 50,000 प्रति हेक्टर. नारळ झाडासाठी- रू 250 प्रति झाड, सुपारी झाडासाठी- रू 50 प्रति झाड, 2 हेक्टरच्या मर्यादेत.

Maharashtra Lockdown: लॉकडाऊन पूर्ण उठवला जाणार नाही, तो वाढेल पण शिथिलता दिली जाणार

दुकानदार आणि टपरीधारक

दुकानदार आणि टपरीधारक जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव  स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत त्यांना  पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रू.10,000 पर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी.

मत्सव्यवसायिकांना मदत 

मत्सव्यवसायिकांना नुकसान भरपाई - बोटींची अंशत: दुरूस्ती रू 10,000 पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी रू.25,000,अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी रू 5000, पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी रू. 5000. आपत्ती प्रसंगी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली अनुदान/मदत घेतली असल्यास वरील मदत अनुज्ञेय असणार नाही. पूर्वी रोजगार हमी योजनेखाली जशी फळबाग योजना लागू होती त्याच धर्तीवर सचिव, जलसंधारण व रोजगार हमी योजना यांनी योजना कार्यान्वित करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल. नुकसान झालेल्या कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा जास्तीत जास्त रू.5000 इतकी मदत देण्यात येईल. चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना दिनांक 26.08.2020 च्या शासन निर्णयान्वये मोफत अन्नधान्य व केरोसीन वाटप करण्यास मान्यता देण्यात आली. “तौत्के” चक्रीवादळामुळे झालेल्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 4 लक्ष रुपये इतक्या रक्कमेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त 1 लक्ष रुपये इतकी मदत देण्यात येईल.

गुजरातमध्ये तौत्के चक्रीवादळ आल्यावर कुठलीही मागणी न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजारो कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. पंतप्रधानांनी राज्याचा दौराही केला नाही आणि मदतही जाहीर केली नाही. कोकणातही येऊन पंतप्रधानांनी भेट देऊन मदत जाहीर करावी अशी आमची विनंती आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

नवे निकष लावल्यामुळे कोकणवासियांना अधिक मदत दिली जाणार आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी सरकार अधिकचा निधी देत मदत देत आहे. अजूनही काही पंचनामे शिल्लक आहेत, त्यामुळे या मदतीत आणखी वाढ होऊ शकते अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

First published:

Tags: Cyclone, Vijay wadettiwar