महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

एफवाय आणि एसवाय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 जलै ते 15 जुलैदरम्यान संपवाव्यात.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात घोषित करण्यात लॉकडाऊन विस्कटलेले शैक्षणिक सत्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)नवे अकॅडमिक कॅलेंडर जारी केले आहे. सोबतच गाइडलाइंसही दिल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

हेही वाचा... पवारांच्या बारामतीत चाललंय तरी काय, ऐतिहासिक वास्तू रातोरात केली जमीनदोस्त

विद्यापीठ,महाविद्यालय परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाला प्राप्त झाल्या आहेत. आयोगाच्या प्राप्त सूचनांच्या अधीन राहून राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा घेतल्या जातील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा या 1 जुलै ते 15 जुलै 2020 दरम्यान घेण्यात याव्यात तसेच बारावी नंतरचा प्रवेश लवकरात लवकर देऊन 1 सप्टेंबर 2020 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करावी, असा सूचना आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्ष याचे वेळापत्रक तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसोबत लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा.. राज्यपालांची 'काळी टोपी' येते घटनात्मक जबाबदारीच्या आड, काँग्रेस नेत्याची बोचरी

या बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांवर सविस्तरपणे चर्चा करून राज्यातील परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष याचा अहवाल तयार करण्यात येईल त्यानंतर सर्व कुलगुरूंशी चर्चा करून अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव याचा अंदाज घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यांच्या सोबत परीक्षापद्धती आणि शैक्षणिक वर्षयाबाबत चर्चा करून लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा, अशी मागणी माजी शिक्षण मंत्री आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यपालांकडे केली आहे.

कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः कुलपती म्हणून राज्यपालांनी लक्ष द्यावे. ऑनलाईन शिक्षण, त्याची साधने, मुल्यांकन व शैक्षणिक दर्जा याबाबत टाक्स फोर्स नियुक्त करा, अशी मागणी करीत आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा.. Coronavirus नंतरच्या आर्थिक संकटात रिलायन्सने घेतले मोठे निर्णय; मुकेश अंबानींनी सोडलं संपूर्ण वेतन

कोरोनामुळे आर्थिक नुकसान जसे होणार तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ही होणार आहे. शिक्षणामध्ये प्रत्येक वर्षे महत्त्वाचे असल्याने एकिकडे राज्य आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दुष्टीने उभे करावे लागणार आहे, तसेच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वेळीच तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. माजी शिक्षण मंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी काल शाळांनी केलेली फी वाढ शासनाच्या निदर्शनास आणून दिली तसेच आज उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या, तसेच शालेय व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये किमान 10 टक्के सवलत द्यावी यासाठी शासनाने निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे.

तसेच आज कुलपती म्हणून राज्यपालांची राजभवनावर भेट घेऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आमदार अँड. आशिष शेलार यांनी मांडले.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 30, 2020, 6:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या