मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Free Vaccination: राज्यात सरसकट मोफत लसीकरण होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Free Vaccination: राज्यात सरसकट मोफत लसीकरण होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्यात 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याच्या संदर्भात राज्यमंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याच्या संदर्भात राज्यमंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याच्या संदर्भात राज्यमंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई, 28 एप्रिल: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्त्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. ठाकरे सरकारने (Thackeray Government) येत्या 1 मे 2021 पासून 18 वर्षे ते 44 वर्षे या वयोगटातील नागरिकांना मोफत लस (Free vaccination for Maharashtra citizens) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 5 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं, "आज राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Cabinet) निर्णय घेतला आहे की, राज्यातील 5 कोटी 71 लाख (18 ते 44 वयोगटातील) नागरिकांना मोफत लसीकरण करायचं. त्यामुळे अंदाजे दोन कोटी लशींचे डोस राज्य सरकारला विकत घ्यावे लागणार आहेत त्यासाठी साधारणत: 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे."

1 मे पासून लसीकरण नाही

राज्यात 1 मे 2021 पासून लसीकरण सुरू होणार का? यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लसींचा साठा उपलब्ध नसल्याने तात्काळ सर्वांचे लसीकरण सुरू होणार नाही. नागरिकांना विनंती आहे की, थेट सेंटरवर न जाता Co-Win App वर नाव नोंदणी करुन मगच लसीकरणासाठी केंद्रावर जावे.

मंगळवारी (27 एप्रिल 2021) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत लसीकरणावर म्हटलं होतं की, राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याच्या कागदपत्रांवर मी स्वाक्षरी केली आहे. या संदर्भात आता निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारमधील बहुतेक मंत्री हे मोफत लसीकरण करण्यात यावे यासाठी आग्रही आहेत तर काही मंत्र्यांचे म्हणणे आहे की, दारिद्र रेषेखालील नागरिकांना मोफत लस देण्यात यावी. तसेच ज्या नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा नागरिकांनी लसीकरणाचे पैसे द्यावेत. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत होती. पण अखेर राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय़ घेतला आहे.

लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी

लसीकरणात महाराष्ट्र राज्य हे देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 53 लाख 37 हजार 382 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकर राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांचे लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

First published: