07 एप्रिल : पत्रकार हल्लाविरोधी विधेयक विधानसभासह विधान परिषदेतही मंजूर झालंय. या कायद्याने पत्रकारांना आता कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर या कायद्यासाठी आंदोलन सुरू होतं. अखेर या लढ्याला यश आलंय. महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यमानी संस्था ( हिंसक कृत्ये आणि मालमतेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंधक ) विधेयक २०१७ विधानसभेत हे विधेयक विनाचर्चा मंजूर करण्यात आलं. त्यानंतर काहीवेळातच विधान परिषदेतही मान्य करण्यात आला...त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हे विधेयक विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर पत्रकार हल्लाविरोधी कायदा अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
प्रसारमाध्यमातल्या व्यक्तींवर हिंसाचार आणि हल्ले तसंच प्रसारमाध्यम संस्थांच्या मालमत्तेची हानी याला आळा घालण्यासाठी हे विधेयक आहे. असे हल्ले करणाऱ्याला, हिंसाचार करणाऱ्याला अथवा तशी चिथावणी देणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे
पत्रकार हल्लाविरोधी कायदा तरतूद
- पत्रकारावर हल्ला केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास
- 50 हजार रुपयांचा दंड
पत्रकारांवरील आतापर्यंतचे हल्ले
2015- 72 पत्रकारांवर हल्ले
2016- 65 पत्रकारांवर हल्ले
2017- 82 पत्रकारांवर हल्ले
मीडिया संस्थांवरील हल्ले-82
गेल्या 3 महिन्यातील हल्ले-16
गेल्या 10 वर्षांत 800 पत्रकारांवर हल्ले