धनगर समाजाला मोठा दिलासा; राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 03:44 PM IST

धनगर समाजाला मोठा दिलासा; राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय!

मुंबई, 30 जुलै: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने गेल्या काही दिवसांपासून महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आज (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असताना राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या अखत्यारीतील एसटी समाजाला असणाऱ्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू होणार आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)

VIDEO: सत्तेच्या बाजूने असल्याशिवाय पर्याय नाही, राजीनाम्यानंतर शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...