शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांपर्यंत कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांपर्यंत कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

. शेतकरी कर्जमाफीसाठी 34 हजार कोटींची घोषणा केलीये. शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी करण्यात आलीये.

  • Share this:

24 जून : अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळत राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीसाठी 34 हजार कोटींची घोषणा केलीये. शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी करण्यात आलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातली सर्वात मोठी कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं.शेतकऱ्यांनी सरसकट दीड लाखांचं कर्जमाफ करण्यात आलंय. या कर्जमाफीमुळे राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच या कर्जमाफीमुळे  90 टक्के याचा लाभ घेता येईल. पीककर्जासोबत मध्यम कर्जही माफ आणि टर्म लोनही माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना' सुरू करण्यात आली असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विशेषतः 2012 सालच्या दुष्काळामुळे जो शेतकरी कर्जात बुडालाय त्याला कर्जमाफी देण्याची मागणी होत होती. सभागृहात आम्ही आश्वासन दिलं होतं. अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत करू. विविध घटकांशी चर्चा सुरू होती. मध्यंतरीच्या काळात आंदोलनं झाली. त्यानंतर मंत्रिगटाची उच्चाधिकार समिती तयार केली होती. सुकाणू समितीशी चर्चा केली. मी स्वतःही अनेकांशी चर्चा केली. राजकीय पक्षांशी चर्चा केली. मी स्वतः राजू शेट्टींशी शरद पवारांशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली. चर्चेअंती राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

34,000 कोटींची कर्जमाफीला कॅबिनेटची मंजुरी

1,50,000 कर्जमाफी सरसकट

८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ

या निर्णयामुळे 90 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार

ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ

या निर्णयामुळे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार

6 टक्के शेतकऱ्यांना ओटीएसखाली आणणार

पीककर्जासोबत मध्यम कर्जही माफ टर्म लोन माफ

 जे शेतकरी नियमित कर्ज भरातात त्यांना 25 टक्के म्हणजेच 25,000 कमाल मर्यादा प्रोत्साहन भत्ता जमा करणार

तेवढं कर्ज कमी भरलं तर तेवढ्या पैशांची हमी सरकार घेऊन तेवढे पैसे अनुदान म्हणून त्यांच्या खात्यात भरणार

बँकांशी टायअप करून त्यांचे हप्ते पाडून पैसे परत करणार

 कर्जमाफी ही  'छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना' या योजनेनं अोळखली जाणार

राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना लाभ नाही

मंत्री आणि आमदारांनी त्यांचा 1 महिन्याचा पगार कर्जमाफीसाठी देण्याचा निर्णय घेतलाय.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी 2007 सालीच लागू झाल्यात

पैसे आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2017 04:20 PM IST

ताज्या बातम्या