मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ठाकरे सरकार Vs राज्यपाल वादाचा नवा अंक, थेट राजभवनावर धडकला निरोप

ठाकरे सरकार Vs राज्यपाल वादाचा नवा अंक, थेट राजभवनावर धडकला निरोप

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा 'लेटर वॉर

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा 'लेटर वॉर

मुख्य सचिवांमार्फत राज्यपाल कार्यालयाला राज्य सरकारचा आक्षेप आणि अधिकारांची जाणीव करून देण्यास सांगण्यात आले होते.

मुंबई, 04 ॲागस्ट : राज्यपाल( governor) विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) वाद सर्वश्रुत आहे. आता पुन्हा एकदा नव्या वादाची ठिणगी पडली आहे. राज्य सरकारकडून मुख्य सचिव सीताराम कुंटे (sitaram kunte) यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यालयाला राज्य सरकारचा आक्षेप कळवला तसेच अधिकारांची जाणीवही करून दिली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. राज्यपालांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राज्य सरकारमधील हस्तक्षेपावरून सर्व मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

तसंच मुख्य सचिवांमार्फत राज्यपाल कार्यालयाला राज्य सरकारचा आक्षेप आणि अधिकारांची जाणीव करून देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यालयाला राज्य सरकारचा आक्षेप कळवला तसेच अधिकारांची जाणीवही करून दिली.

विशेष म्हणजे, राज्यपालांनी १२ आमदारांची यादी अजूनही आपल्याकडे राखून ठेवली आहे. राज्य सरकारकडून वारंवार विनंती करण्यात आल्यानंतर सुद्धा राज्यपाल यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मध्यंतरी पावसाळी अधिवेशनाच्या आधी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन विधानसभा अध्यक्ष निवडीबद्दल निवेदन दिले होते. त्यानंतर राज्यपालांनी राज्या सरकारला पत्र लिहून अध्यक्ष निवडीचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचं सांगितलं होतं. राज्यपालांच्या या भूमिकेवरूनही वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारने राज्यपालांच्या पत्राला केराची टोपली दाखवत अध्यक्षांची निवड टाळली होती. आता पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्ह आहे.

First published: