पुरग्रस्तांसाठी सरसावले हजारो हात, 8 दिवसांमध्ये तिजोरीत जमा झाली 'एवढी' रक्कम

पुरग्रस्तांसाठी सरसावले हजारो हात, 8 दिवसांमध्ये तिजोरीत जमा झाली 'एवढी' रक्कम

मदतीचा हा ओघ अजूनही सुरुच आहे. त्यामुळे संकटाच्या काळात धावून जाण्याची महाराष्ट्राची वृत्ती पुन्हा एकदा दिसून आलीय.

  • Share this:

मुंबई 13 ऑगस्ट : कोल्हापूर, सांगली, कराड या भागात आलेल्या महापुराच्या महासंकटाने अवघा महाराष्ट्र हेलावलाय. महापुराचं संकट आता ओसरलं आता. हजारो संसार उभारण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं. ते आव्हान पेलण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो हात पुढं येत आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये मुख्यमंत्री साह्यता निधीत तब्बल साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झालीय. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना धनादेश देण्यासाठी विविध संस्था आणि नागरिकांची रीघ  लागली होती. मदतीचा हा ओघ अजूनही सुरुच आहे. त्यामुळे संकटाच्या काळात धावून जाण्याची महाराष्ट्राची वृत्ती पुन्हा एकदा दिसून आलीय.

रक्षाबंधनाच्या तोंडावर मावस बहीण-भावाची आत्महत्या, FB वर लिहिली भावुक पोस्ट

राज्यातील पूर परिस्थितीमुळे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला होणारं राज्य सरकारचं स्नेहभोजन आणि चहापान रद्द करण्यात आलंय. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे 14 ऑगस्टला विदेशी महावाणिज्यदूत आणि इतर मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात येतं, ते यंदा रद्द करण्यात आलंय

केंद्राकडे  6 हजार कोटींची मागणी

राज्यात महापूराच्या संकटानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्रीही हजर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या स्थितीचा आढावा घेतला आणि मंत्र्यांनीही आपली भूमिका मांडली. महापूराची स्थिती भीषण असल्याने जे नुकसान झालं त्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे 6 हजार 813 कोटींच्या मदतीची मागणी केलीय. केंद्रानं आत्तापर्यंत पूर्ण मदत केली आहे आणि जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सावधान! मॉलच्या लेडिज चेंजिंग रूममध्ये सापडलं 'हे'; रूम वापरण्याआधी हे वाचा

ज्या भागात पूरस्थिती ओढवली तिथे काही महिने कायम मंत्री असतील. त्याचबरोबर ज्यांना गावं दत्तक घ्यायची असतील त्यांना गावं उपलब्ध करून दिली जातील असंही त्यांनी सांगितलं. महाजनादेश यात्रा तात्पुरची स्थगित करण्यात आली आहे. सर्व मंत्री आपलं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी साह्यता निधीला देणार आहेत. पूराचं कारण शोधण्यासाठी आणि पर्यावरणातल्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 13, 2019, 7:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading