मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Maharashtra Flood: पूरग्रस्त भागातील रस्त्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार मोठा निर्णय

Maharashtra Flood: पूरग्रस्त भागातील रस्त्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार मोठा निर्णय

महाराष्ट्रात दरवर्षी कोकण पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पुराचा फटका मोठ्या प्रमाणात समस्यांना बसतो.

महाराष्ट्रात दरवर्षी कोकण पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पुराचा फटका मोठ्या प्रमाणात समस्यांना बसतो.

महाराष्ट्रात दरवर्षी कोकण पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पुराचा फटका मोठ्या प्रमाणात समस्यांना बसतो.

मुंबई, 30 जुलै : कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात (Flood due to heavy rain) मोठं नुकसान झालं आहे. राज्यभरात रस्ते आणि पुलांचं 2000 कोटींचं नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज असून त्यात राज्यांतर्गत जोडणारे जिल्हांतर्गत जोडणारे तसेच छोटे-मोठे रस्ते पूल याचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला रस्ते, पूल दुरुस्तीसाठी 2000 कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. यामुळेच आता राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

पूरग्रस्त भागातल्या सखल रस्त्यांची उंची वाढवण्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार करत आहे. वारंवार पूर येणारे ठिकाणी रस्तावर मोठे पूल बांधल्यास रस्ता वाहतूक बंद राहणार नाही याचा विचार करून सार्वाजनिक बांधकाम विभाग जास्त उंचीवर पूल बांधण्याचा विचार सुरु आहे. पूर परिस्थितीत रस्ते सुरु राहील्यास मदतकार्य करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

"मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री" उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

कोकणात आणि कोल्हापूर, सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता पाहणी आणि आढावा घेतात. सध्या पुराचा फटका बसणार याठिकाणी राज्यातील किती व कार्यकारी अभियंता जाऊन पाहणी करत आहेत. तसेच आढावा देखील घेत आहेत. सध्या आरोग्याचा संकट आल्याने प्रत्येक विभागाला विकास निधी खर्च करण्याची मुभा 60 टक्के असून मुळातच बजेट कमी असल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागाला नवीन खर्च परवडणार नाही. अशातच पुराचा फटका बसलेल्या ठिकाणी नव्याने निधी खर्च करावा लागणार आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुराचा फार मोठा फटका बसल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. तर छोट्या नद्या, नाल्यांवर असणारे फुल देखील वाहून गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे अशा ठिकाणी तात्काळ आवश्यक असणाऱ्या रस्त्यांवर वारंवार जिथे पाणी येते असे या ठिकाणी उंच पूल करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम करत आहे. त्या अनुषंगाने सर्वे करण्याच्या सूचना देखील दिल्याचे समजते. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत की, राज्यात वारंवार जिथे पूर येणाऱ्या रस्त्यांवर अधिक उंची वाढवून पूल बांधला वाहतूक कायमस्वरूपी चालू कशी ठेवता येईल याचा विचार केला जात आहे तूर्तास सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आर्थिक निधी तितकासा नाही. पण अत्यावश्यक असणाऱ्या ठिकाणी छोट्या मोठ्या नद्या नाल्यांवरील मुलांची उंची वाढवणे तसेच रस्त्यांचा दर्जा वाढवणे ही प्राथमिकता असणार आहे.

First published:
top videos

    Tags: Ashok chavan, Maharashtra, Rain flood