मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maharashtra Flood: नेत्यांनी पूरग्रस्त भागात दौरे टाळावेत, शरद पवारांचे आवाहन

Maharashtra Flood: नेत्यांनी पूरग्रस्त भागात दौरे टाळावेत, शरद पवारांचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पूरस्थितीवर भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पूरस्थितीवर भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पूरस्थितीवर भाष्य केलं आहे.

मुंबई, 27 जुलै: कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती (Flood due to heavy rainfall) संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी राजकीय नेत्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात येणाऱ्या मदतीच्या संदर्भातही सविस्तर माहिती दिली. शरद पवार यांच्या समवेत दिलीप वळसे पाटील , सुनिल तटकरे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे सुद्धा पत्रकार परिषदेत उपस्थितीत होते.

रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे आतोनात नुकसान झाले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात माळीन घटना घडली होती तिथे पुनवर्सन कसं केले त्याच धर्तीवर मदत करावी. नवं गाव गावठाण उभे करणे आव्हान असते. संकटात उभारणी करणे गरजेच आहे असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

राजकीय नेत्यांना आवाहन

पूरग्रस्त भागात राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. यावर शरद पवारांनी भाष्य करत म्हटलं, राजकीय नेते दौरे करतानाच गरजेचे पूर्तता करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा करणं गरजेचं पण इतर नेतांनी टाळावे. अनेक लोक विनाकरण दौरा त्यामुळं शासकीय यंत्रणा लक्ष विचलित करतात त्यामुळे विनाकरण दौरा करू नये. आज राज्यपाल दौरा करत आहेत केंद्राकडून अधिक मदत मिळवून देतील असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात

राष्ट्रवादीच्या वेल्फेअर मदत केली जात आहे. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करणार आहोत. 2 लाख मास्कचं वाटप करणार, पूरग्रस्तांना अन्नधान्य, भांडी, पांघरूण, मास्क आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार आणि येत्या दोन-तीन दिवसांत ही मदत पोहोचवली जाणार आहे. पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथक पाठवणार आहोत. केमिकल असोसिएशन वतीने औषध ही पूरग्रस्त भागात दिली जातील अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

शरद पवार - महाराष्ट्र 7-8 जिल्ह्यांत पूराचे संकट

अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं संकट

रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे आतोनात नुकसान

दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात माळीन घटना घडली होती तिथे पुनवर्सन कसं केले त्याच धर्तीवर मदत करावी

नवं गाव गावठाण उभे करणे आव्हान असते

संकटात उभारणी करणे गरजेच

16 हजार घर नुकसान आता माहिती मिळाली

रत्नागिरीत चिपळूण, खेड भागात पाच हजार घरांचे नुकसान

पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात

राष्ट्रवादीच्या वेल्फेअर मदत केली जात आहे

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार

2 लाख मास्कचं वाटप करणार

पूरग्रस्तांना अन्नधान्य, भांडी, पांघरूण, मास्क आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार

येत्या दोन-तीन दिवसांत ही मदत पोहोचवली जाणार

पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथक पाठवणार

केमिकल असोसिएशन वतीने औषध ही पूरग्रस्त भागात दिली जातील

राजकीय नेते दौरे करतानाच गरजेचे पूर्तता करणे आवश्यक

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा करणं गरजेचं पण इतर नेतांनी टाळावे

अनेक लोक विनाकरण दौरा त्यामुळं शासकीय यंत्रणा लक्ष विचलित करतात त्यामुळे विनाकरण दौरा करू नये

आज राज्यपाल दौरा करत आहेत केंद्राकडून अधिक मदत मिळवून देतील

राज्यात मदत धोरणावर पुन्हा विचार केला पाहिजे नवीन काही बदल केले पाहिजे

धोरणात नवीन काही बदल करणे गरजेचे

राज्य सरकार लवकरच मदतीची घोषणा करणार

पूरस्थितीचा अहवाल आल्यावर अंतिम मदतीची

अशा संकटांचा सामना करण्याचा महाराष्ट्राला अनुभव आहे

First published:

Tags: Konkan, Maharashtra, Rain flood, Sharad pawar