मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maharashtra Flood: पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून सहा हजार कोटींची मदत?

Maharashtra Flood: पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून सहा हजार कोटींची मदत?

महाराष्ट्रामध्ये पुराचा फटका मोठ्या प्रमाणात आठ जिल्ह्यांना बसला असून स्थानिक लोकांना मदत करण्याच्या हेतूने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक मदतीच्या संदर्भातील पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये पुराचा फटका मोठ्या प्रमाणात आठ जिल्ह्यांना बसला असून स्थानिक लोकांना मदत करण्याच्या हेतूने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक मदतीच्या संदर्भातील पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये पुराचा फटका मोठ्या प्रमाणात आठ जिल्ह्यांना बसला असून स्थानिक लोकांना मदत करण्याच्या हेतूने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक मदतीच्या संदर्भातील पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई, 27 जुलै: राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी (Flood relief package) सुमारे 8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे असा प्राथमिक अंदाज राज्य सरकारने (Preliminary estimates by State Government) नुकताच वर्तवला आहे. यात कोकणातील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) आणि विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा  समावेश आहे. पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेले पूल बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत यांचा यात समावेश आहे.

मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले की, अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. घरांची, मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आहे. वारंवार घडणार्‍या या घटनांचा विचार करता शासन मदत करणारच आहे, पण यावर कायमस्वरूपी काय उपाययोजना करायच्या यावरही विचार सुरू आहे. कोकण हा इको सेंसेटिव्ह झोन जाहीर करण्याची शिफारस गाडगीळ समितीने केली आहे, त्यामुळे नैसर्गिक वैभवाला छेडछाड केली तर असे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कटू निर्णय घेण्याची गरज मला तरी वाटते. आता नुकसानग्रस्तांना काय मदत करता येईल याबाबत आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा आहे.

Taliye Landslide: तीन मुलांना मरणाच्या दारातून खेचून आणले, वाचा तळीयेतील हिरकणीची शौर्यगाथा

एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम वेळेवर पोहचल्या नाहीत अशा तक्रारी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरुपी टीम तैनात केल्या पाहिजेत असा विचार आहे. जिल्हा स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन केंद्र बळकट करणे, शेतीचं नुकसान झालं आहे, रस्ते वीजेचे नुकसान झालंय या सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेली गावं, पूर रेषेत असलेले गावं यांचं पुनर्वसन करणं याबाबतही चर्चा होणार आहे. या सगळ्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आधी बैठक होणार आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर संध्याकाळी चर्चा होणार आहे.

या सगळ्यांबद्दल आज चर्चा होऊन उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत याला मान्यता दिली जाईल. रस्त्याला 1600 ते 1700 कोटी, वीजेचे नुकसान झालं आहे त्याला 500 कोटी खर्च येण्याची शक्यता आहे. ज्या गावाचं पुनर्वसन करायचं ती घरं म्हाडाने बांधावी आणि तिथल्या नागरी सुविधा शासन देईल असा विचार आहे. तीन टप्प्यात यांचं पुनर्वसन होण्याची आवश्यकता आहे. दरडी खालील गावं शोधण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सौम्य धोकादायक गावं कोणती? तसंच कायम पूर येतो अशा गावाचा शोध घेऊन त्यांचं पुनर्वसन करणं असं तीन टप्प्यात हे काम करायचं आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

First published:

Tags: Maharashtra, Rain flood, Vijay wadettiwar