करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'च्या गोदामात अग्नितांडव, मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक

गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 07:17 AM IST

करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'च्या गोदामात अग्नितांडव, मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक

मुंबई,30 एप्रिल : गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली आहे. रात्री उशिरा 2.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग विझवताना एक जवानदेखील जखमी झाला आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तीन मजली असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'चं गोदाम येथे आहे. या आगीमध्ये धर्मा प्रोडक्शनच्या गोदामामधील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं आहे.  दरम्यान आग लागण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.Loading...दुसरीकडे, सोमवारी (29 एप्रिल) संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास माटुंगा पश्चिमेकडील बिग बाजारात बांधकामाच्या तळमजल्यावर देखील आग लागली होती. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. ही आग विझवण्यासाठी बिग बाजार, पाम हाउस, सोसायटीमधील भिंत अग्निशमन दलानं पाडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा 'X फॅक्टर', आता पुढची तयारी...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: firemumbai
First Published: Apr 30, 2019 06:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...