दोन महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी,मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा संप स्थगित

दोन महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी,मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा संप स्थगित

अहमदनगरमधील शेतकऱ्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटायला बोलावून घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर या शेतकऱ्यांनी संप स्थगित केल्याचं जाहीर केलं.

  • Share this:

16 मे : 1 जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली होती. संप करू असं सर्वात आधी म्हटलेल्या पुणतांबा, अहमदनगरमधील शेतकऱ्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटायला बोलावून घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर या शेतकऱ्यांनी संप स्थगित केल्याचं जाहीर केलं. मात्र  राज्यातील इतर भागातील शेतकरी संपावर ठाम आहे.

सर्वात आधी नगरच्या काही शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मग संपूर्ण राज्यात तसे ठराव झाले. 2500 ग्रामपंचायतीने ठराव केले. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि काही शेतकऱ्यांना चर्चेला बोलावलं. सातबारा कोरा व्हायला हवा, 8 तास मोफत वीज मिळायला हवी, दुधाला हमीभाव असे मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. मुख्यमंत्र्यांनी 1 तास चर्चा केली सगळं ऐकून घेतलं. 2 महिन्यात कर्ज माफी देऊ असंही म्हटलं आहे. सरकारला वेळ देऊन संप स्थगित केला आहे. सरकारला दोन महिन्याचा वेळ दिला आहे.

2 महिन्यात 100 टक्के पॉझिटिव्ह निर्णय घेणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असून यासाठी 2 महिन्याचा कालावधी त्यांनी मागितलाय.

First published: May 16, 2017, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading