संपूर्ण कर्जमाफी नोव्हेंबरमध्ये!,आज 5 ते 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

संपूर्ण कर्जमाफी नोव्हेंबरमध्ये!,आज 5 ते 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

आज साधारणत: पाच ते दहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळणार उर्वरित शेतकऱ्यांना नोव्हेंबर अखेर पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. राज्यात 79 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचं राज्यसरकारन जाहीर केलं होतं.

  • Share this:

18 आॅक्टोबर : कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना आजपासून कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होण्याच्या प्रक्रियेला आज सुरुवात होणार आहे. मात्र, आज फक्त पाच ते दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.

कर्जमाफी वाटपासाठी आज एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पंधरा शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम चेकच्या रुपात दिली जाणार आहे.

आज सह्याद्री अतिथीगृहाववर विशेष कार्यक्रम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी सोहळा आयोजित कऱण्यात आला आहे.

आज साधारणत: पाच ते दहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळणार उर्वरित शेतकऱ्यांना नोव्हेंबर अखेर पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. राज्यात 79 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचं राज्यसरकारन जाहीर केलं होतं. म्हणजे आज जर दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तरी 69 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नोव्हेंबरनंतरच पैसे जमा होणार आहे.

कर्जमाफी आजपासून होणार असली तरी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत यावर मुख्यमंत्री ठाम आहेत.

आत्महत्या थांबवण्यासाठी इतर उपाय आहेत. त्यावर आम्ही काम करतोय. पुढच्या महिन्यात भाजपच्या सरपंचांचा मेळावा मुद्दाम घेणार आहे. ग्रा.पं. निवडणुकीत भाजपला सर्वाधिक यश मिळाले आहे ते आम्ही सिध्द करू असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच  नांदेड निवडणुकीत भाजपची टक्केवारी वाढली. नांदेडात भुईसपाट झालेल्या पक्षांना फुकटचा आनंद का झाला? असं म्हणत त्यांनी सेनेला टोला लगावला.

शेतकरी कर्जमाफीचे ठळक मुद्दे -

- बॅंकांनी यापूर्वी सरकारला सादर केलेली कर्जदार शेतकऱ्यांची संख्या - 89 लाख 20 हजार

- प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या - 56 लाख 69 हजार

- राज्यात अंदाजे 30 हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी होणार

- पहिल्या टप्यात म्हणजेच 18 नोव्हेंबरला अंदाजे 20 टक्के शेतकऱ्यांच्याच बँक खात्यात पैसे जमा होणार

- यानंतर प्रत्येक पाच दिवसांनी पुढच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील

- 20 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असेल

- 40 हजार ते 75 हजार कर्जमाफी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर असेल

- दीड ते 2 लाखांपर्यंत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या दहा लाखांपेक्षाही कमी

- नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस हजार जमा होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 09:47 AM IST

ताज्या बातम्या