मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी: वाचा...केवळ या जिल्ह्यांतच घरपोच मिळणार दारू

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी: वाचा...केवळ या जिल्ह्यांतच घरपोच मिळणार दारू

वाईनशॉप सुरु करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता ॲानलाईन पद्धतीने मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे....

  • Share this:

मुंबई, 13 मे: लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री करता वाईनशॉप सुरु करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता ॲानलाईन पद्धतीने मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  14 मेपासून  सकाळी 10 वाजल्या पासून ही ॲानलाईन मद्यविक्री केली जाणार असून ज्या जिल्हयात आधीपासून मद्यविक्री करण्यास परवानगी होती, त्याच जिल्हयात ॲानलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याआधी 4 मे पासून किरकोळ मद्यविक्रीची दुकाने उघडण्याचा निर्णय झाला होता. परंतु त्यामुळे काही ठिकाणी मोठया प्रमाणेत गर्दी होऊन सोशल डिस्टंसिंगचे पालन झाले नसल्याचे निर्दशनास आले. आता गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भुमिकेतून घरपोच मद्यसेवा देण्याबाबत लोकांची तिव्र स्वरुपाची मागणी विचारात घेवून शासनाने ॲानलाईन मद्यविक्रीस परवानगी दिली आहे.

हेही वाचा...अचानक घरात घुसलेल्या व्यक्तीने केलेले सपासप वार, महिलेने जागेवरच सोडला जीव

स्थानिक प्रशासन संभाव्य परिस्थितीनुसार वाईनशॉप म्हणजेच काऊंटर मद्यविक्री आणि ॲानलाईन मद्यविक्रीवर बंदी आणू शकते, असं देखील आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. ऑनलाईन मद्य विक्री करताना छापील किंमत म्हणजेच एमआरपी दरानेच मद्य विकले जावे अशा सक्त सुचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत. मात्र ॲानलाईन मद्य विक्री करताना दुकानदारांना काही नियम आणि अटी शासनाने घालून दिल्या आहेत. राज्यातील 33 पैकी 21 जिल्ह्यात ॲानलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. तर 12 जिल्हयात ॲानलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आलेली नाही.

काय आहेत नियम व अटी...

1. जिल्हा प्रशासनाने मद्य विक्रीस परवानगी दिलेल्या जिल्ह्यातच ॲानलाईन मद्य विक्री केली जाऊ शकते.

2. रेड झोन मध्ये कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्रीस मनाई आहे.

3. घरपोच मद्यसेवा देण्याची जबाबदारी सर्वस्वी दुकानदाराची राहिल.

4. घरपोच सेवा देणारे कामगार (Delivery Boys) यांची वैद्यकीय तपासणी करुन ते वैद्यकीयदृष्टया पुर्णपणे पात्र ठरल्यासच त्यांना विभागातर्फे तसे ओळखपत्र देण्यात येईल.

5. संबंधित घरपोच सेवा देणारे कामगार (Delivery Boys) मास्क, हेड कॅप, हातमोजे, हॅन्ड सेनिटायझर व वारंवार हातमोजे निर्जतुक करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईडचाचा वापर करतील.

6. घरपोच सेवा देणारे प्रत्येक दुकानाच्या मागे जास्तीत जास्त १० कामगार राहतील.

7. घरपोच मद्यसेवा बाबतच्या या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 14 मेपासून सकाळी 10 वाजले नंतर सुरू करण्यात येईल.

8. आदेशानुसार सदयस्थितीत घरपोच मद्यसेवा कोव्हीड-19 लॉकडऊन कालावधीच करीता लागू राहील.

9. घरपोच मद्यसेवा ही गर्दी, संपर्क, संसर्ग टाळण्याच्या दृष्टीकोणातून सुरू करत असल्यामुळे किरकोळ विक्री (MRP) दरानेच सेवा देण्यात यावी.

10. मद्य मागणी करण्याऱ्या ग्राहकाकडे आवश्यक मद्यसेवन परवाना नसल्यास ते तो परवाना या विभागाच्या www.stateexcise.maharashtra.gov.in किवा www.exciseservices.mahaonline.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन प्राप्त करु शकतील किंवा संबंधित दुकानदाराकडून विकत घेवू शकतील

11. मद्य बाळगणे, वाहतूक करणे इ. मद्यसेवन परवान्यातील तर तूदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची संबंधित दुकानदारांनी दक्षता घ्यावयाची आहे.

12. शासनाचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे दुकानदार, Delivary boy व ग्राहकास बंधनकारक राहणार आहे.

हेही वाचा..मुंबई पोलिसांसाठी मध्यरात्री वाईट बातमी, आणखी एका पोलिसाची कोरोनाशी झुंज अपयशी

या जिल्ह्यात ॲानलाईन मद्यविक्री सुरु होणार

1. ठाणे ( फक्त ठाणे ग्रामीण भाग )

2. पालघर

3. रायगड

4. पुणे

5. सोलापूर

6. अहमदनगर

7. कोल्हापुर

8. सांगली

9. सिंधुदुर्ग

10. रत्नागिरी

11. नाशिक

12. धुळे

13. जळगांव

14. नंदुरबार

15. गोंदिया

16. अकोला

17. वाशिम

18. बुलढाणा

19. अमरावती

20. भंडारा

21. यवतमाळ

हेही वाचा.. रस्त्यावरच झाली प्रसूती, दीड तासाने 1100 किमी दूर गावी जाण्यासाठी निघाली चालत

या जिल्ह्यात ॲानलाईन मद्यविक्री नाहीच..

1. सातारा

2. औरंगाबाद

3. जालना

4. बीड

5. नांदेड

6. परभणी

7. हिंगोली

8. नागपुर

9. उस्मानाबाद,

10. लातुर

11. मुंबई

12. मुंबई उपनगर

First published: May 13, 2020, 8:36 AM IST

ताज्या बातम्या