• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करणार, आदित्य ठाकरेंकडून दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी

नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करणार, आदित्य ठाकरेंकडून दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी

Aditya Thackeray Visit Chembur, vikhroli: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 जुलै: मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढलं. या मुसळधार पावसामुळे मुंबई दोन दुर्घटना घडल्या. चेंबूरमध्ये (Chembur Wall Collapsed) भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. तर विक्रोळीमध्ये (Vikhroli House Collapsed) एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील या घटनांमध्ये तब्बल 21 जणांना आपले प्राण गमवावे लागले. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. ही एक नैसर्गिक घटना जरी असली, तरी एवढा पाऊस पडणं अनैसर्गिक आहे. मुंबईत काल रात्री झालेला पाऊस भितीदायक होता. समुद्र किनाऱ्यावरील भागांना धोका जास्त असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसंच येथे डोंगरावर राहत असलेल्या नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात येणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे (Maharashtra Environment Minister) यांनी केली आहे. विक्रोळीत दुर्घटना घडली त्या ठिकाणी एक-दोन वर्षांपूर्वी जी संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. त्यामुळे कमी नुकसान झालं आहे. मात्र दुर्घटना तर घडलीच आहे. सरकारकडून नुकसानग्रस्तांना सर्वोतोपरी मदत पुरवली जात असल्याचं ते म्हणालेत. 25 घर सुरुवातीला स्थलांतरीत करण्यात येईल. त्यानंतर उर्वरित नागरिकांना सूचना देऊन पुढील काळात त्वरित स्थलांतरीत केले जाईल, अशी माहिती मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. तसंच तीन ठिकाणी काल दरड कोसळली आहे. आपण सर्वांनीच पाहिलं की, काल कशाप्रकारे पाऊस झाला. अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण 200 मिमी पेक्षा जास्त होतं. आम्ही मुंबईतील बेकायदेशीर घरं आहेत, त्यांचा आढावा घेतला जात आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ही घटना एक नैसर्गिक आपत्ती होती. भिंतीच्यावरून माती आणि पाणी आले. भिंत आरसीसीने बनविली होती परंतु पाण्याचे जोर काही थांबवू शकली नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: