SPECIAL REPORT : पवारांच्या विधानांमुळे शिवसेनेचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगणार का?

SPECIAL REPORT : पवारांच्या विधानांमुळे शिवसेनेचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगणार का?

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभावीत आघाडीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या गुगलीमुळं राज्यातील सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. त्यामुळं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संभावित आघाडीचं भविष्य अधांतरी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभावीत आघाडीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. खरंतर राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

मात्र, पवारांच्या या स्पष्टीकरणामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली होती. त्यामध्ये किमान समान कार्यक्रम निश्चित केल्याचा दावा तीनही पक्षांच्या राज्यातील नेत्यांनी केला होता. परंतु, पवारांनी या किमान समान कार्यक्रमाविषय़ी कानावर हात ठेवले आहे. तसंच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत पवारांनी आघाडीतील मित्र पक्षांकडं बोट दाखवलंय. मात्र, शिवसेनेचा आशावाद कायम आहे.

दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं राज्यात सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या प्रयत्नाला पवारांच्या या वक्तव्यामुळं सुरुंग लागला आहे. पवारांची ही गुगली सगळ्यांनाचं बुचकळ्यात टाकणारी आहे.

मुख्यमंत्रिपदावरुन भाजपशी बिनसल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीनं सत्तास्थापनेसाठी जुळवा जुळव केली होती. मात्र, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील भेटीनंतर या संभावित आघाडीतील हवाचं निघून गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तर सत्तेकडं डोळे लावून बसलेल्या शिवसेनेचा जीव टांगणीला लागला आहे.

Published by: sachin Salve
First published: November 18, 2019, 9:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading