मुंबई

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

Online  शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर, पण 10 दिवस नाही तर...

Online  शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर, पण 10 दिवस नाही तर...

शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात मात्र त्यात दिवस कमी करण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई 05 नोव्हेंबर: राज्य सरकारने दिवाळीच्या सुट्ट्यांची घोषणा केली आहे. सध्या कोरोनामुळे शाळा आणि कॉलेजेमध्ये मुलं येत नाहीत. तर सर्वांचा अभ्यास आणि वर्ग हे Online सुरू आहेत. त्यामुळे या सुट्ट्यांमध्ये हे वर्ग होणार नाहीत. यावर्षी कोरोनामुळे जास्त दिवस वाया गेल्याने सुट्ट्यांमध्ये कपात करण्यात आली असून 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर अशी 4 दिवस शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दिवाळीची सुट्टी ही किमान 10 दिवसांची असते. मात्र कोरोनामुळे मार्चपासून सगळीच शाळा कॉलेजेस बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळातही अनेक दिवस वाया गेलेत त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतला गेल्याचं शिक्षण विभागाने म्हटलं आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही गेली काही महिने अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे.

शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात मात्र त्यात दिवस कमी करण्यात आले आहेत. कोरोनामुळे सगळेच घरी असल्याने आता फारसा प्रश्न नाही असंही म्हटलं जातं.

दरम्यान, अकरावी महाविद्यालय प्रवेश संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच अकरावी महाविद्यालयाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. असं शाळेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांनी सांगितलं आहे.  कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु ऑनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे या बद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 5, 2020, 6:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading