Home /News /mumbai /

BREAKING : रश्मी शुक्लांना फोन टॅप प्रकरण भोवणार, पोलिसांनी बोलावले चौकशीला!

BREAKING : रश्मी शुक्लांना फोन टॅप प्रकरण भोवणार, पोलिसांनी बोलावले चौकशीला!

28 तारखेला रश्मी शुक्लांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

    मुंबई, 27 एप्रिल : मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी अखेर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना आता चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने  (Maharashtra Cyber Cell Police) रश्मी शुक्ला यांना समन्स बजावला आहे. राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अहवाल लीक झाला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. आता या प्रकरणी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे, असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे. वायू प्रदूषण करणाऱ्यांची नासा 'इज्जत' काढणार, डेटा सार्वजनिक करणार रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथील निवासस्थानी आहे. त्यांच्या निवासस्थानी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. उद्या म्हणजे, 28 तारखेला रश्मी शुक्लांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. तसंच त्यांनी एक अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता. एवढंच नाहीतर याचा पुरावा केंद्रीय गृहसचिवांकडे देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता रश्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे निदर्शनास आले. एवढंच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांची याचा गैरवापर केला. दिलासादायक! सोमवारी देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, 2764 जणांचा मृत्यू शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले. 'शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपाबरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता' असा दावा आव्हाड यांनी केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या