राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या मोठी; अनलॉकमुळे रुग्णवाढ?

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या मोठी; अनलॉकमुळे रुग्णवाढ?

Maharashtra Covid19 report: राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून: राज्यात कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण झाली आणि त्याचसोबतच रिकव्हरी रेटही वाढल्याने पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला. मात्र, आता अनलॉक झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांची आकडेवारी पाहिली तर राज्यात कोरोनामुक्त (discharge) होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या अधिक (Covid patients number higher than discharge) असल्याचं दिसत आहे.

आज राज्यात 8104 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर त्याचवेळी आज 11,766 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी राज्यात 11,449 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते आणि 12,207 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. बाधितांच्या संख्येत होणारी ही वाढ निश्चितच विचार करण्यासारखी आहे. अनलॉक केल्यानंतर ही वाढ होत असल्याने अद्यापही राज्य सरकारची चिंता कायम आहे.

राज्यात 1,61,704 सक्रिय रुग्ण

आज राज्यात 8104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 56,16,857 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 95.4 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 11766 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 1,61,704 सक्रिय रुग्ण आहेत.

हुश्श! 'वाईट काळ संपला'; कोरोनाबाबत केंद्र सरकारने दिली पॉझिटिव्ह न्यूज

आज राज्यात 406 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 273 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 133 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

आज कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद ?

ठाणे मंडळ - 2127

नाशिक मंडळ - 1103

पुणे मंडळ - 2573

कोल्हापूर मंडळ - 4344

औरंगाबाद मंडळ - 262

लातूर मंडळ - 473

अकोला मंडळ - 562

नागपूर मंडळ - 322

Published by: Sunil Desale
First published: June 11, 2021, 9:55 PM IST

ताज्या बातम्या