मोठी बातमी! पहिल्यांदाच राज्याचा Recovery Rate उच्चांकी 94 टक्क्यांच्या वर

मोठी बातमी! पहिल्यांदाच राज्याचा Recovery Rate उच्चांकी 94 टक्क्यांच्या वर

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 80 हजारावर पोहोचली आहे. राज्यात सध्या 61 हजार 654 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई16 डिसेंबर: कोरोना विरुद्ध गेली काही महिने लढणाऱ्या महाराष्ट्रासाठी (covid-19 update in maharashtra)आता चांगली बातमी आहे. पहिल्यांदाच राज्याचा Recovery Rate हा 94.1 टक्के एवढा उच्चांकी झाला आहे. कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढल्याने हा दरही वाढला आहे. दिवसभरात राज्यात 4 हजार 678 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 17 लाख 69 हजार 897 एवढी झाली आहे. राज्यात 4 हजार 304 नवे रुग्ण आढळले. तर 95 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.58 एवढा झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 80 हजारावर पोहोचली आहे. राज्यात सध्या 61 हजार 654 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 स्वदेशी कोरोनाची लस  (corona vaccine) कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतानाच आता भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिन (COVAXIN) लशीबाबत मोठी माहिती समोर येते आहे. या लशीचं सध्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. आता या लशीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचा परिणाम समोर आला आहे. लशीचा सकारात्मक परिणाम दिसून आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता आशा पल्लवित झाल्या आहेत.

सप्टेंबरमध्येच कोवॅक्सिन लशीचं पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल झालं होतं. ज्याचा अंतिम परिमाण अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.  कोवॅक्सिन किंवा BBV152 ही लस शरीरातील अँटिबॉडीजना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रेरित करत असल्याचं दिसून आलं आहे. शिवाय ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात स्टोअर करता येऊ शकते. ज्यामुळे सरकारसमोर लस साठवण्याचं आव्हान नसेल. यामुळे लशीकरण मोहिमेअंतर्गत ही लस देशभरात सहजरित्या उपलब्ध करता येऊ शकते.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 16, 2020, 9:05 PM IST

ताज्या बातम्या