नगरसेवकांचे अच्छे दिन, झाली भरघोस पगारवाढ !

नगरसेवकांचे अच्छे दिन, झाली भरघोस पगारवाढ !

राज्यातील 27 महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या पगारात वाढ करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने आज मंजुरी दिलीय

  • Share this:

15 जुलै : राज्यातील 27 महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या पगारात वाढ करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने आज मंजुरी दिलीय. या निर्णयाचा फायदा राज्यातील मुंबईसह अ,ब आणि क वर्गातील महानगरपालिकांना होईल.

नगरसेवकांच्या पगारात वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. आमदारांच्या पगारात वाढ केल्यानंतर या मागणीने जोर धरला होता.  मात्र अखेर नगरसेवकांच्या रेट्यापुढे हा निर्णय मान्य करण्यावाचून सरकारपुढे पर्याय उरला नाही.

कर्जमाफीच्या निर्णयानंतर सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता. अशात राज्य आर्थिक संकटात असतानाच नगरसेवकांची पगारवाढ नक्की का केली असा सूर सर्वसामान्य जनतेतून उमटतोय.

27 महापालिकांमध्ये नगरसेवकांची पगारवाढ

मुंबई महानगरपालिका २५००० रूपये पगारवाढ

अ वर्ग महानगरपालिका २०००० रूपये पगारवाढ

ब वर्ग महानगरपालिका १५००० रूपये पगारवाढ

क वर्ग महानगरपालिका १०००० रूपये पगारवाढ

First published: July 15, 2017, 10:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading