मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'...तर तिसऱ्या लाटेची भीती नाही' आरोग्यमंत्र्यांनी सांगितला उपाय

'...तर तिसऱ्या लाटेची भीती नाही' आरोग्यमंत्र्यांनी सांगितला उपाय

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

Rajesh Tope on Corona virus third wave: राज्यात कोरोनाची तिसरी लाट होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर एक रामबाण उपाय आरोग्यमंत्र्यांनी सांगितला आहे.

मुंबई, 6 जुलै : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना संभाव्य तिसरी लाट (Coronavirus third wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने (Maharashtra Government) पूर्व तयारी करत कोरोनावर मात करण्यासाठी पूर्ण केली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे कोविड प्रतिबंधक लस आणि नियमांचे पालन करणे आहे. त्याच दृष्टीने आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी एक उपाय सांगितला आहे.

विधानसभेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं, राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. लोकल सुरू करा म्हणून मागणी लोकांची आहे मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी लसीकरणाला गती महत्वाची आहे. रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांत आधी लसीकरण पूर्ण करायला हवं. 3 कोटी लस प्रतिमाहिना उपलब्ध झाली तर तिसऱ्या लाटेची भीती नाही.

कोरोनानंतर आता नवं संकट! Bone Death ची प्रकरणं वाढणार; मोदी सरकारने केलं सावध

जास्त लसीकरण करणार महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. आपलं राज्य हे केरळ नंतर एक टक्क्यापेक्षा लस वेस्टेज करणार राज्य आहे. लसीकरण हा रामबाण इलाज आहे. येणाऱ्या काळात मोठ्याप्रमाणात लस उपलब्ध व्हावी. बिणबुडाच्या टीकेला अर्थ नाही असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्यात एमपीएससीची 15511 पदे भरणार - उपमुख्यमंत्री

2018 वर्षापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. कालच अजित पवार यांनी एमपीएससीचा कारभार गतिमान करताना महाराष्ट्र आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्यात येणार असल्याचं सांगितले होते.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Maharashtra, Rajesh tope