मुंबई, 17 जून: राज्यात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त (discharge) होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत होती आणि रिकव्हरी रेटही वाढत होता. मात्र, आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ (number of patient increase) झाली आहे. अचानक होणारी ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी ठरू शकते.
आज राज्यात 5890 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 56,85,636 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, आज राज्यात 9830 रुग्णांचे निदान झाले आहे. बाधितांची संख्या कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. आज राज्यात 236 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा 1.95 टक्के इतक आहे.
आज राज्यात 9830 रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 59,44,710 इतकी झाली आहे. तर राज्यात सध्या 1,39,960 सक्रिय रुग्ण आहेत. एक नजर टाकूयात आज कुठल्या विभागात किती नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
ठाणे विभाग - 2174
नाशिक विभाग - 966
पुणे विभाग - 2417
कोल्हापूर विभाग - 3192
औरंगाबाद विभाग - 169
लातूर विभाग - 385
अकोला विभाग - 311
नागपूर विभाग - 216
एकूण - 9830 नवीन रुग्णांचे निदानमहाराष्ट्रात धडकणार कोरोनाची तिसरी लाट; परिणामांबाबत WHO-AIIMS ने जारी केला रिपोर्टआज कुठल्या विभागात किती मृत्यू?
ठाणे विभाग - 58
नाशिक विभाग - 36
पुणे विभाग - 53
कोल्हापूर विभाग - 65
औरंगाबाद विभाग - 2
लातूर विभाग - 14
अकोला विभाग - 4
नागपूर विभाग - 4
एकूण - 236
आज राज्यात एकूण 236 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 167 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 69 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांची संख्या 400 ने वाढली आहे अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.