Home /News /mumbai /

राज्यातील रुग्णवाढीला ब्रेक मात्र, मृतकांचा आकडा धडकी भरवणारा

राज्यातील रुग्णवाढीला ब्रेक मात्र, मृतकांचा आकडा धडकी भरवणारा

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागला असला तरी मृतकांच्या संख्येत वाढ होता दिसत आहे.

    मुंबई, 27 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना विषाणूची साखळी (Coronavirus chain) तोडण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येला ब्रेक लागला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत नसली तरी मृतकांचा आकडा हा चिंता वाढवणारा आहे. आज 67752 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 36,69,548 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)83.21 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 66358 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 895 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 392 रुग्ण हे मागील 48 तासातील आहेत तर 179 रुग्ण हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 26254737 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44,10,085 (16.80 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42,64,936 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 30,146 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. वाचा: Positive Story: सकारात्मक विचार आणि पोटावर झोपणे या जोरावर 82 वर्षीय आजींची कोरोनावर मात राज्यात आज रोजी एकूण 6,72,434 सक्रिय रुग्ण राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्हात 104561 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात 75219 सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात 72,302 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईत 68,603 सक्रिय रुग्ण आहेत. आज कुठल्या विभागात किती रुग्ण? ठाणे - 10031 नाशिक - 17064 पुणे - 122215 कोल्हापूर - 3316 औरंगाबाद - 3639 लातूर - 4442 अकोला - 3878 नागपूर - 11773 आजची एकूण रुग्णसंख्या - 66358
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Maharashtra

    पुढील बातम्या