• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • LIVE Updates : भिवंडीतील काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रोडवर 3 किमीपर्यंत वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण

LIVE Updates : भिवंडीतील काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रोडवर 3 किमीपर्यंत वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 01, 2021, 17:26 IST
  LAST UPDATED 9 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:24 (IST)

  मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट, सोबत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रतिनिधींचं शिष्टमंडळ

  21:46 (IST)

  अण्णा हजारेंची न्यूज18 लोकमतला खास मुलाखत
  'कोरोना रोखण्यात सरकार अपयशी ठरलं नाही'
  अण्णा हजारेंनी केली मविआ सरकारची पाठराखण
  'राज्यातील कोरोना बराच आटोक्यात आला'
  एकमेकांवर आरोप करणं चुकीचं - अण्णा हजारे
  'आरोप-प्रत्यारोप न करता लोकांसाठी कामं करावं'
  केंद्र आणि राज्य सरकारला अण्णा हजारेंचा सल्ला
  राजकारणी सत्तेत गुंग झालेत - अण्ण हजारे
  'सत्ता आणि पैशाभोवती राजकारण्यांचा पिंगा'
  'दारूची दुकानं का उघडली? तिथं कोरोना नाही?'
  अण्णा हजारेंचा मविआ सरकारला सवाल
  राज्यातील मंदिरंच बंद का? - अण्णा हजारे
  मला राजकारणाशी देणं-घेणं नाही - अण्णा हजारे
  अण्णा हजारेंनी आपल्यावरील आरोप फेटाळले
  मोदी सरकारविरोधात 7 आंदोलनं केली - अण्णा
  'भाजपला पूरक भूमिका घेतल्याचा आरोप दुर्दैवी'
  भ्रष्टाचार व्यवस्थेला लागलेला महारोग - अण्णा
  मुख्यमंत्री पत्राची दखल घेत नाहीत - अण्णा हजारे

  20:31 (IST)

  विधान परिषदेतील 12 आमदार नियुक्तीचा मुद्दा
  मविआ नेते आणि राज्यपालांची बैठक संपन्न
  उद्धव ठाकरे, अजित पवार, थोरात होते उपस्थित
  आमदार नियुक्तीबाबत राज्यपालांशी केली चर्चा
  राज्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा - अजित पवार
  राज्यपालांसोबत सकारात्मक चर्चा - अजित पवार
  12 आमदारांचा निर्णय लवकरच - अजित पवार
  लोकांचा जीव वाचवणं आमचं कर्तव्य - अजित पवार

  19:32 (IST)

  विधान परिषदेतील 12 आमदार नियुक्तीचा मुद्दा
  मुख्यमंत्र्यांसह मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला
  उद्धव ठाकरे, अजित पवार, थोरात राजभवनवर
  आमदार नियुक्तीबाबत राज्यपालांशी करणार चर्चा
  12 आमदार नियुक्तीचा तिढा सुटण्याची शक्यता

  19:13 (IST)

  वरळी किल्ला आणि परिसराचा विकास पुरातत्व संचालनालय आणि बृहन्मुंबई महापालिका संयुक्तरीत्या करणार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांची माहिती
  वरळी किल्ला संवर्धन आणि परिसर विकासासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला पुढाकार

  19:8 (IST)

  घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील नवीन उड्डाणपुलावर वाहनवेग नियंत्रित करण्यासाठी दोन्ही बाजूने दर 500 मीटर अंतरावर बसवणार गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि गतिरोधक दर्शक फलकही लावणार, वाहनं घसरू नये म्हणून आवश्यक तिथं पृष्ठभाग खरबडीत करणार, अतिरिक्त रम्बलर्स बसवणार

  18:51 (IST)

  पुणे - गट शिक्षणाधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना अटक, पुणे जिल्हा परिषदेत एसीबीची कारवाई

  17:53 (IST)

  1971 युद्धातील विजयोत्सवानिमित्त 'गेटवे'वर कार्यक्रम
  मुख्यमंत्र्यांनी केलं स्वर्णिम विजय मशालीचं स्वागत

  17:35 (IST)

  शिवसेना-भाजप एकत्र येणार की नाही हे येणारा काळ ठरवेल पण सध्या आम्ही 3 पक्ष एकत्र, संजय राऊतांचं विधान, शिवसेना खासदार संजय राऊतांची 'न्यूज18 लोकमत'ला रोखठोक मुलाखत

  17:19 (IST)

  शिवसेना खासदार संजय राऊत EXCLUSIVE
  राऊतांची 'न्यूज18 लोकमत'ला रोखठोक मुलाखत
  नारायण राणेंवर फार चर्चा कशाला? - राऊत
  प्रत्येकानं कर्तव्य ओळखून काम करावं - राऊत
  'कायदेशीर कारवाईवर मी बोलणं चुकीचं'
  'सामना' रोज नवीन विषय घेऊन येतो - राऊत
  आपण आपल्या राज्याला देणं लागतो - राऊत
  सोशल मीडिया नवीन व्यासपीठ - संजय राऊत
  'बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ सार्वजनिक जागा'
  राणेंना कुणीही विरोध केला नाही - संजय राऊत
  'सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण हवं'
  मंदिरं बंद ठेवण्याची इच्छा नाही - संजय राऊत
  राज्य सरकारची कोरोनाविरोधात लढाई - राऊत
  विरोधासाठी कुणी विरोध करू नये - संजय राऊत
  काही नियम पाळून मंदिरंही उघडतील - राऊत
  'आमची बंधनं ही केंद्र सरकारची नियमावली'
  शिवसेना खासदार संजय राऊत EXCLUSIVE
  राऊतांची 'न्यूज18 लोकमत'ला रोखठोक मुलाखत
  'फाईल का क्लिअर नाही ते राज्यपालांना माहीत'
  संविधान तुम्ही पायदळी तुडवत आहात - राऊत
  'राज्यपालांनी फाईलवर सही करायला हवी'
  हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान - राऊत
  नाना पटोले आमचे मित्रच आहेत - संजय राऊत
  'प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवायची मुभा'
  याक्षणी आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत - संजय राऊत
  तिन्ही पक्षात चांगला समन्वय - संजय राऊत
  'केंद्र सरकारकडून आम्हाला जास्त अपेक्षा होत्या'
  'मदतीची 700 कोटींची केंद्राकडून केवळ घोषणा'
  'गरज असेल तिथं एकत्र निवडणुका लढवणार'
  'मुंबईवर कायम पगडा हा शिवसेनेचाच राहिला'
  'सत्तेत असलो तरी संघटनेचं काम व्यवस्थित सुरू'
  नवी ऊर्जा मिळाली की पक्ष पुढे जातो - राऊत
  'राज्याचे पोलीस एकतर्फी कारवाई करत नाहीत'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स