liveLIVE NOW

Live Updates: मुरबाडमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 07, 2021, 22:09 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:51 (IST)

  दिल्ली एनसीबी दक्षता पथकाचे प्रभाकर साईलला समन्स
  प्रभाकर साईल हा ड्रग्जप्रकरणी महत्त्वाचा साक्षीदार
  साईलनं एनसीबी, वानखेडेंवर केलेत गंभीर आरोप
  यापूर्वीही बजावले होते समन्स, मात्र तो हजर झाला नाही

  20:47 (IST)

  दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद
  श्रीनगरच्या बटमालूमधील धक्कादायक घटना

  19:27 (IST)

  मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण
  सुनील पाटीलला हजेरीचे विशेष पथकाचे आदेश
  झोन 1 कार्यालयात सुरू आहे पाटीलची चौकशी
  व्हॉट‌्सअॅप चॅट, रेकॉर्डिंग दिल्याची माहिती
  मी या प्रकरणाचा सूत्रधार नाही - सुनील पाटील
  माझी बदनामी केली जातेय, सुनील पाटलाचा दावा
  'जर पुरावे होते तर सादर का केले नाहीत?'
  सुनील पाटीलचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू
  जबाब नोंदवून जाऊ देणार असल्याची माहिती
  मोहित भारतीय यांची चौकशी करा - सुनील पाटील
  विशेष तपास पथकाकडे सुनील पाटीलची मागणी
  'न्यूज18 लोकमत'ला सूत्रांनी दिली माहिती

  18:57 (IST)

  पंढरपूर - संतांचा पालखी मार्ग भूमिपूजन सोहळा
  पालखी मार्गाच्या कामाचं उद्या व्हर्च्युअल भूमिपूजन
  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पंढरपूरच्या दौऱ्यावर
  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी साधणार संवाद

  18:35 (IST)

  न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर दमदार विजय
  पाकिस्तान आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये
  टी-20 वर्ल्ड कपमधील भारताचं आव्हान संपुष्टात

  18:30 (IST)

  सुनील पाटील झोन-1च्या SIT पोलीस कार्यालयात
  ACP मिलिंद खेतले करणार सुनील पाटीलची चौकशी
  तब्येत बरी नसल्यानं आर्यन NCB चौकशीला येणार नाही

  18:18 (IST)

  गोपीचंद पडळकर गट वि. शिवसेना-राष्ट्रवादी गट
  सांगलीच्या आटपाडी परिसरात आले आमनेसामने
  पडळकरांच्या ताफ्यातील गाडी फोडली, काहीजण जखमी
  सांगलीच्या आटपाडीमध्ये पोलिसांची कुमक वाढवली
  उमेदवार पळवापळवीवरून दोन्ही गटांमध्ये झाला वाद

  18:11 (IST)

  विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक
  एसटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन
  राज्यात बहुतांश ठिकाणी एसटी सेवा ठप्प
  एसटी कर्मचारी संपात कृती समितीचीही उडी
  एसटी संप उद्यापासून राज्यव्यापी होणार
  पुणे डेपोही उद्यापासून बंद राहण्याची शक्यता
  आतापर्यंत फक्त 50 डेपोंपुरता संप मर्यादित होता
  मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना सहभागी होणार?
  कृती समितीशी बोलून अंतिम निर्णय घेऊ - संदीप शिंदे
  एसटी कर्मचारी संघटना कृती समितीचे अध्यक्ष शिंदे

  18:10 (IST)

  नवाब मलिकांचा खुलासा पाहिला - वळसे पाटील
  वस्तुस्थिती काय आहे तपासात पुढे येईल - गृहमंत्री
  'धुळे जिल्हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली'
  सुनील पाटील NCPचा कार्यकर्ता नाही - वळसे पाटील

  17:40 (IST)

  मुंबई पोलीस सुनील पाटीलला अन्य ठिकाणी घेऊन गेले
  मुंबई पोलीस झोन-1 ला घेऊन गेल्याची माहिती
  याच कार्यालयात आहे एसआयटीचं ऑफिस
  आझाद मैदान पोलीस ठाण्यात झाला होता हजर

  627822कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स