• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • LIVE : आमदार रवी राणा ईडी कार्यालयात, सेनेच्या माजी खासदाराविरोधात केली होती तक्रार

LIVE : आमदार रवी राणा ईडी कार्यालयात, सेनेच्या माजी खासदाराविरोधात केली होती तक्रार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 05, 2021, 17:33 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:2 (IST)

  महाड-भोर-पुणे घाटात टँकर फसला
  4 तासांपासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
  दरड कोसळलेल्या ठिकाणी अडकला टँकर
  8 महिने अवजड वाहतुकीसाठी घाट होता बंद

  20:33 (IST)

  कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे प्रश्न
  'अडचणी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक'
  'यासंदर्भात समिती गठित करण्यात यावी'
  पणनमंत्री बाळासाहेब पाटलांची सूचना

  20:28 (IST)

  पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारकं, संग्रहालयं कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचं पालन करून खुले करण्यास मान्यता -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

  20:24 (IST)

  भाजपची कोअर कमिटीची बैठक
  भाजप प्रदेश मुख्यालयात बैठक सुरू
  फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित
  सी.टी. रवी, 2 सहप्रभारी उपस्थित
  विजय पुराणिक, संजय कुटे उपस्थित
  पंकजा मुंडे, बावनकुळे, महाजन उपस्थित
  दानवे, मंगलप्रभात लोढा, शेलार उपस्थित
  आगामी विविध निवडणुकांचा मुद्दा
  पक्षसंघटनेच्या तयारीचा आढावा घेणार

  20:19 (IST)

  पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांची समन्वय समिती -मुख्यमंत्री
  नियमांचं उल्लंघन करून नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांना थेट टाळं लावण्याच्या सूचना -उद्धव ठाकरे

  19:55 (IST)

  राज्यात दिवसभरात 3,160 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 2,828 रुग्ण बरे
  राज्यात दिवसभरात 64 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.87 टक्के
  राज्यात सध्या 49,067 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:51 (IST)

  ठाण्यात मोठी घटना टळली
  धावत्या बसला लागली आग
  माजिवडा इथं बसनं घेतला पेट
  आग विझवण्यात अग्निशमनला यश
  28 प्रवाशांना सुरक्षित काढलं बाहेर

  19:45 (IST)

  विजय पाटलांचा बोलवता धनी कोण आहे हे सगळ्या राज्याला माहिती आहे, मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार, आम्ही किंवा तक्रारदार तरी पुण्याला होते का हे पाहिलं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, या घटनेत मी एक टक्का दोषी असेन तर मी शिक्षा भोगायला तयार -गिरीश महाजन

  19:44 (IST)

  पुण्याच्या संस्थेत दोन गट आहेत त्यांचे वाद आहेत, संस्था मराठा समाजाची आहे, मी ओबीसी आहे, हे सगळं हास्यास्पदच, हा गुन्हा तेव्हा का नोंदवला नाही? -गिरीश महाजन

  19:44 (IST)

  8 जानेवारी 2018 मधील प्रकरण, आता नोव्हेंबरमध्ये गुन्हा 3 वर्षांनी दाखल झालाय, हा गुन्हा पुण्याला घडला आणि गुन्ह्याची नोंद मध्य प्रदेश बॉर्डरला झालीय, पोलिसांनी हतबल आहे असं सांगत गुन्हा नोंदवावा लागतोय असं सांगितलंय -गिरीश महाजन

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स