LIVE Updates : मराठवाड्यात 25 लाख हेक्टर शेती उध्वस्त; सोयाबीन, तूर, मूग, कापूस आणि फळबागांना फटका

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 29, 2021, 17:25 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:19 (IST)

  फेब्रुवारीत होऊ घातलेल्या निवडणुकांच्या तयारीसाठी मनसे लागली कामाला, 1 आणि 2 ऑक्टोबरला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर, अमित ठाकरे 1, 2, 3 ऑक्टोबरला कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर, नाशिकप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीत अमित ठाकरे आणि इतर नेते सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा घेणार, त्यानंतर राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीचा दौरा करणार

  20:49 (IST)

  वनक्षेत्रपाल गट 'अ'पदासाठी MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, 100 जागांसाठी होती भरती, वैभव दिघे हा विद्यार्थी राज्यात खुल्या तसेच मागासवर्ग प्रवर्गातूनही पहिला

  20:18 (IST)

  राज्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा
  खड्ड्यांच्या दुरुस्ती, उपाययोजनांवरील बैठक संपली
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होती बैठक
  अजित पवार,एकनाथ शिंदे,अशोक चव्हाण होते हजर
  'रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही'
  मात्र निधीचा विनियोग व्यवस्थित व्हावा - मुख्यमंत्री
  'कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई'
  'संबंधित अधिकाऱ्यावरही कारवाई केली जाणार'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बैठकीनंतर निर्देश

  19:1 (IST)

  '4 ऑक्टोबरपासून मुंबईतल्या शाळा सुरू होणार'
  'मुंबईत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार'
  मुंबई महापालिका आयुक्तांकडून परवानगी
  अन्य वर्गांबद्दल नोव्हेंबरमध्ये निर्णय घेणार - चहल

  18:33 (IST)

  नाशिक - 'बलात्कार करणाऱ्या आरोपीवर कारवाई करा'
  'आरोपीवर कारवाई सोडून न्याय मागणाऱ्यांवर गुन्हे'
  'ठिय्या करणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांवरच गुन्हे'
  आणि तीही इतकी कलमं दाखल केली गेली - फडणवीस
  'न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन काय गुन्हा आहे?'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला सवाल

  18:6 (IST)

  पुण्यात प्लास्टिक बंदीला सर्वाधिक प्रतिसाद - आदित्य
  इलेक्ट्रिक मोबिलिटी अत्यावश्यक - आदित्य ठाकरे
  'माझी वसुंधरा मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवणार'
  पर्यावरणासाठी मिशन मोडमध्ये काम - आदित्य ठाकरे

  18:2 (IST)

  शिर्डी विमानतळासभोवताली सर्व सुविधांयुक्त शहर वसवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मंजुरी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या बैठकीत निर्णय

  17:57 (IST)

  'मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी'
  देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी
  कोकणात अजून मदत मिळाली नाही - फडणवीस
  पोकळ शब्द किंवा नुसती आश्वासनं नको - फडणवीस
  प्रत्यक्ष आणि तातडीच्या मदतीची गरज - फडणवीस
  राज्य सरकारनं गांभीर्यानं विचार करावा - फडणवीस

  17:40 (IST)

  जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
  धरणाचे दरवाजे साडेतीन फुटांनी उघडले
  गोदावरी नदीपात्रात 66,024 क्युसेक विसर्ग
  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  17:29 (IST)

  अतिवृष्टीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्यांना दिलासा
  'त्या' विद्यार्थ्यांची सीईटी 9, 10 ऑक्टोबरला - सामंत
  'परीक्षा चुकलेल्या आजारी विद्यार्थ्यांनाही सीईटीची संधी'
  उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स