मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा
रेड, ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांना सतर्कतेचे निर्देश
'राज्य, जिल्हा आपत्कालीन यंत्रणांनी समन्वय साधावा'
सहकार्यानं बचाव-मदतकार्य करा, अजित पवारांचे निर्देश
20:28 (IST)
निर्मिती संस्थांना लॉकडाऊन कालावधीतील मूळ निर्धारित भाड्याच्या 40 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
20:17 (IST)
सुरत-गुजरात मार्गावरील सापुतारा घाटात दरड कोसळली
अवघ्या 2 तासात 133 मिलिमीटर पावसाची नोंद
कळवण-सापुतारा हद्दीत मुसळधार पाऊस सुरू
घाटात दरड कोसळल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
19:55 (IST)
'डिजिटल बारामती ॲम्ब्रेला ॲप'चं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण, डिजिटल बारामती ॲम्ब्रेला ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांचं दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होईल - अजित पवार
19:24 (IST)
ठाणे - शिपाई गणेश शिंदे निलंबित, फेरीवाल्यांकडून हप्ता गोळा करत होता, मनसेनं आणलं होतं प्रकरण उघडकीस
18:57 (IST)
अनिल परबांची ईडीकडून चौकशी संपली
अनिल परबांची तब्बल 8 तास चालली चौकशी
मुंबईतील ईडी कार्यालयात झाली चौकशी
ईडीच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली - अनिल परब
ईडीच्या चौकशीला सहकार्य - अनिल परब
18:54 (IST)
ठाणे - कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस
ठाणे मनपा हद्दीतील कळवा भागातील प्रकार
डॉक्टर आणि परिचारिकेला केलं निलंबित
लस घेणाऱ्या नागरिकाची प्रकृती स्थिर
18:52 (IST)
MPSC 2019 राज्यसेवा परीक्षा अंतिम निकाल जाहीर
खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले राज्यात प्रथम
मागास प्रवर्गातून रोहन कुंवर पहिला
महिला प्रवर्गातून मानसी पाटील पहिली
MPSC आयोगाकडून 420 जणांची अंतिम यादी
कोरोना, आरक्षण रद्द झाल्यानं निकालाला विलंब
'न्यूज18 लोकमत'नं केला होता पाठपुरावा
उपजिल्हाधिकारी, DYSP, तहसीलदारपदांसाठी भरती
18:39 (IST)
साकीनाका परिसरातील बलात्कार, खून प्रकरण
मुंबई पोलिसांनी चार्जशीट केली दाखल
18:35 (IST)
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
स्थानिक नागरिक आणि भाजप आमदारांचं आंदोलन
बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक न झाल्यानं आंदोलन
महिलेवर सराईत गुहेगारानं केला होता बलात्कार
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स