liveLIVE NOW

Live Updates: नाशिकचे माजी उपमहापौर, विद्यमान अपक्ष नगरसेवक गुरमित सिंग बग्गा यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 27, 2021, 17:02 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:9 (IST)

  मुंबईत लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ
  मुंबईत 2 हजार 700 गर्भवतींचं लसीकरण
  2 डोस घेणाऱ्या गर्भवतींची संख्या 853
  गर्भवतींमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम कायम

  21:25 (IST)

  पूरस्थितीमुळे बाधित 14 जिल्ह्यांसाठी 2860 कोटींच्या मदतीनंतर 9 जिल्ह्यांसाठी 774 कोटी मदत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  20:56 (IST)

  पुणे - ट्रॅव्हल्समध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

  राजगड पोलिसांकडून दोघांना अटक, इतरांचा शोध
  आरोपींकडून 37 लाख 71 हजारांचे दागिने हस्तगत

  19:59 (IST)
  नागपूर येथील नागनदीच्या पुनर्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आज कॅबिनेटच्या खर्च व वित्त समितीची मंजुरी, प्रकल्पाच्या 2 हजार 117 कोटींच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा
   
  19:53 (IST)

  'कॅगच्या आक्षेपांना लोकलेखा समितीत उत्तर द्यावं लागतं'
  'कॅगचा आक्षेप होता, समितीसमोर काल साक्ष झाली'
  कालची साक्ष ठराविक एक-दोन मुद्यांवर - परब
  त्याचा अर्थ क्लीन चिट होत नाही - अनिल परब
  'सरकारच्या समितीचा अहवाल अजून आलेला नाही'
  मग क्लीन चिट कसली? अनिल परब यांचा सवाल
  'अहवाल येईल तेव्हा भाजपनं आनंद साजरा करावा'
  परिवहन मंत्री अनिल परबांचा भाजपला टोला

  19:43 (IST)

  एसटी कर्मचारी संघटनेसोबत चर्चा झाली - अनिल परब
  रास्त मागण्यांबाबत सकारात्मक आहोत - अनिल परब
  महागाई भत्ता 5 टक्के दिला - अनिल परब
  'घरभाडं भत्ता, इतर मागण्यांवर सरकार सकारात्मक'
  एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घ्यावे - परब
  उद्या एसटी महामंडळाची बैठक - अनिल परब
  'एसटी महामंडळ बैठकीत काही मागण्यांवर चर्चा होईल'
  'एसटी कर्मचार्‍यांना 12 टक्के महागाई भत्ता होता'
  महागाई भत्ता आम्ही 17 टक्के केला - अनिल परब
  'एसटी कर्मचाऱ्यांना आता 28 टक्के वाढ हवी आहे'
  आर्थिक तरतूद करावी लागेल - अनिल परब
  'दिवाळीनंतर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय'

  19:1 (IST)

  जलयुक्त शिवारला क्लीन चिट नाहीच - जयंत पाटील
  अजून चौकशीच पूर्ण झालेली नाही - जयंत पाटील
  'खोटी माहिती कुणी पसरवली, चौकशी करणार'

  18:22 (IST)

  मुंबई शहर, उपनगरात वीजपुरवठा खंडित प्रकरण
  ऊर्जा विभागाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर
  'पुन्हा अशी घटना न घडण्यासाठी उपाययोजना'
  'अतिसंवेदशील भागात 25 ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण'
  'एकूण 289 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असणार नजर'
  'ऊर्जा विभागाची कंट्रोल रूम तयार केली जाणार'
  'मेंटेनन्सबाबत नवीन एसओपी तयार करणार'

  18:6 (IST)

  दिवाळी सणासाठी गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना
  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ नये
  दिवाळी सण यंदा साधेपणानं साजरा करा
  दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करावा
  खरेदीसाठी गर्दी नको, फटाके फोडणं टाळावं
  ज्येष्ठ, लहान मुलांनी घराबाहेर जाणं टाळावं
  दिवाळी पहाट कार्यक्रम कोरोना नियमावलीनुसार

  17:55 (IST)

  राज्यातील नगरपालिका, महापालिकांमधील नगरसेवक
  नगरसेवकांच्या संख्येत 15% वाढीचा प्रस्ताव मंजूर
  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी
  मुंबई मनपा नगरसेवक संख्येत कोणतेही बदल नाहीत

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स