परमबीर सिंगांनी केलेत गृहमंत्र्यांवर आरोप
'त्या' आरोपांची न्यायालयीन चौकशी होणार
'निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करणार'
महाविकास आघाडी सरकारचा निर्णय
'लवकरच नियुक्त करणार चौकशी आयोग'
21:56 (IST)
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
भोस्ते घाट, कशेडी घाट या 2 डोंगरांवर वणवा
वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, वन्यजीवांना मोठा धोका
21:45 (IST)
एनआयएची टीम 2 आरोपींना घेऊन मुंबईत, यापूर्वी एटीएसच्या ताब्यात असलेल्या आरोपींची एनआयए ताब्यात आल्यानंतर पुन्हा चौकशी होणार, एटीएसच्या तपासानुसार विनायक शिंदे आणि नरेश गोर हे मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी, ठाणे कोर्टाच्या निर्णयानंतर एटीएसकडून एनआयएकडे देण्यात आलाय तपास
20:49 (IST)
सचिन वाझेचा सहकारी API रियाझ काझी सरकारी साक्षीदार, एनआयएची ठाणे कोर्टात माहिती
20:42 (IST)
मालेगाव - विराने शिवारातील घटना, सेल्फीनं घेतला दोन सख्ख्या भावांचा बळी, सेल्फी काढण्याच्या नादात धरणात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
20:25 (IST)
डॉ.रमण गंगाखेडकर यांची 'न्यूज18 लोकमत'ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत, लस घेतल्यानंतरही काळजी आवश्यक, बेपर्वाईचा बसू शकतो फटका, लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, कोरोना लस न घाबरता घ्यावी, लसीनंतर ताप येणं साधं लक्षण -डॉ.रमण गंगाखेडकर
20:17 (IST)
राज्यात दिवसभरात 31,855 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 15,098 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 95 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 88.21 टक्के
राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 47,299
19:48 (IST)
सावधान! मुंबईकरांनो, धोका वाढला
मुंबईत आज कोरोनाचा महाविस्फोट
मुंबईत दिवसभरात 5185 नवे रुग्ण, 8 मृत्यू
मुंबईत आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ
19:33 (IST)
नागपुरात कोरोनाचा प्रकोप सुरूच
नागपूरमध्ये दिवसभरात 3717 नवे रुग्ण
नागपुरात दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू
19:28 (IST)
ज्याबाबत माफी मागितली तेच प्रकरण -आव्हाड
'फोन टॅपिंगबाबत एकदा माफी मागितलीय'
'रश्मी शुक्लांकडून महाराष्ट्राच्या बदनामीचं काम'
'महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं षड्यंत्र'
फोन टॅपिंग प्रकरण गंभीर -जितेंद्र आव्हाड
अनेक मंत्र्यांचे फोन टॅप झाल्याचा संशय -आव्हाड
फोन टॅपिंगवर अनेक मंत्र्यांचा संताप -आव्हाड
'कुणाचीही परवानगी न घेता फोन टॅप केले'
जितेंद्र आव्हाडांचा रश्मी शुक्लांवर हल्लाबोल
'परवानगी कोणी दिली, लवकरच समोर येईल'
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स