liveLIVE NOW

LIVE Updates: कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी विशेष पॉवर ब्लॉक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 22, 2021, 22:17 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 24 DAYS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:21 (IST)

  'न्यूज18 लोकमत'नं दाखवली होती बातमी
  माहीम किल्ला परिसरातील रहिवाशांना नोटीस
  'संपूर्ण झोपड्यांचा होणार स्टेशन सर्व्हे'
  लोकांनी सहकार्य करावं, मुंबई मनपाचं आवाहन
  'सर्व्हे करताना कामामध्ये अडथळा आणू नये'
  'अडचण असल्यास मनपा कार्यालयाशी संपर्क करावा'

  21:18 (IST)

  मुंब्रा पोलीस ठाण्यात यूपी एटीएस दाखल
  सम्राटनगरमधून एकजण यूपी एटीएसच्या ताब्यात
  ताब्यातील इसमाची मुंब्रा पोलीस ठाण्यात चौकशी

  20:54 (IST)

  कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजारांच्या आर्थिक मदतीची केंद्राची शिफारस, सुप्रीम कोर्टानं केली होती सूचना

  20:16 (IST)

  राज्यातील कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांचा मुद्दा
  'जिल्ह्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवावा'
  उद्धव ठाकरेंच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सूचना
  'रुग्णसंख्या कमी होत असली तरी आरोग्य नियम पाळा'
  नियम पाळण्यात बेफिकिरी नको - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  19:53 (IST)

  दिवा आणि ठाणेदरम्यान 5व्या आणि 6व्या लाईनसंदर्भात 26 सप्टेंबरला कळवा आणि मुंब्रादरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवरब्लॉक

  19:51 (IST)

  राज्य सरकार NEET परीक्षेबाबत आढावा घेणार, तामिळनाडू सरकारनं NEET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय, त्याच धर्तीवर ही परीक्षा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी फायद्याची आहे का याबाबत राज्य सरकार आढावा घेणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली चर्चा, MBBS प्रवेशासाठी देशपातळीवर NEET ही एकच सामाईक परीक्षा घेतली जाते

  19:31 (IST)

  अभिनेता सोनू सूदची 'न्यूज18 लोकमत'ला खास मुलाखत, माझ्याकडे प्रत्येक देणगीचा हिशेब, आयकर विभागाला सर्व माहिती दिली, परदेशातून आलेल्या निधीचीही माहिती दिली, मी अशा कारवाईला घाबरणार नाही, माझं काम अविरतपणे सुरूच राहणार - सोनू सूद
  हैदराबादमध्ये गोरगरीबांसाठी रुग्णालय बांधणार, मला राजकारणात रस नाही, मी राज्यसभेची ऑफर दोनदा नाकारली - सोनू सूद

  19:28 (IST)

  मुख्यमंत्र्यांना संसदीय प्रणाली माहीत नाही - राणे
  त्यामुळे त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं - राणे
  'राज्यपालांना सत्ताधारी पक्षाला सूचनेचा अधिकार'
  'उद्धव ठाकरेंना राज्यपालांच्या अधिकारांची माहिती नाही'
  'प्रथम एखाद्या अधिकाऱ्याकडून माहिती करून घ्यावी'
  अनंत गीते जे बोलले त्यामध्ये सत्यता - नारायण राणे

  19:19 (IST)

  मुंबई वगळता इतर महापालिकेसाठी 3 चा प्रभाग
  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
  मुंबई महापालिकेत एकसदस्यीय प्रभाग पद्धती
  उर्वरित महापालिकेत 3 सदस्यीय प्रभाग पद्धती
  नगरपालिका, नगरपरिषदेत 2 सदस्यीय प्रभाग
  नगरपंचायतीत एकसदस्यीय प्रभाग पद्धती
  प्रभाग पद्धतीचा निर्णय एकमतानंच - एकनाथ शिंदे

  19:5 (IST)

  नगरपालिकेतही ओबीसी आरक्षण 50% आणणार
  मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढण्यात आला अध्यादेश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स