liveLIVE NOW

LIVE Updates: क्रिकेटच्या बाबतीत मी स्वत:ला मुंबईकर म्हणवतो - शरद पवार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 21, 2021, 20:06 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:11 (IST)

  येत्या रविवारी अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली बैठक
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता
  नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीत हजर राहणार?
  या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर - सूत्र
  उद्धव ठाकरे-शाहांची वेगळी भेट होण्याचीही शक्यता

  21:31 (IST)

  परभणी - दोन्ही प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
  येलदरी, निम्न दुधना प्रकल्प काठोकाठ भरले
  येलदरीमधून 23,798 क्युसेक पाण्याचा विसर्ग
  निम्न दुधनातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग
  नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
  नद्यांच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

  20:57 (IST)

  जळगाव - नशिराबादजवळ खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींवर गोळीबार आणि चॉपर हल्ला, एक ठार तर एकजण जखमी

  20:13 (IST)

  माजी कसोटीपटू चंदू बोर्डेंचा पवारांच्या हस्ते सत्कार
  चंदू बोर्डेंचं क्रिकेटसाठी मोठं योगदान - शरद पवार
  राज्यपालांच्या विषयावर शरद पवारांनी बोलणं टाळलं

  20:4 (IST)

  गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षलवादी कारवायांना जशास तसं उत्तर द्या, नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे पोलिसांना सक्त निर्देश, गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश

  20:0 (IST)

  नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करा, वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोलनाका परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी मंत्री छगन भुजबळांच्या कार्यालयात पार पडली बैठक, नाशिक-मुंबई महामार्गाची 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करा, अन्यथा संबंधितांवर कारवाई करणार - छगन भुजबळ

  19:39 (IST)

  मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे एका वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नॅशनल मेडिकल कौन्सिलची मान्यता

  19:8 (IST)

  फोर्स वन हद्दीतील आदिवासी पाड्यांचं म्हाडामार्फत कालबद्ध रीतीनं पुनर्वसन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  19:7 (IST)

  निवडणूक आयोगाचा भाजप आमदारांना दिलासा
  राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार
  निलंबित 12 भाजप आमदारांना मतदान करता येणार
  विधानसभेबाहेर मात्र त्यासाठी बूथ लावावा लागेल

  18:52 (IST)

  पुणे - अॅमेनिटी स्पेसच्या विषयावर आता भाजपची सावध भूमिका, सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार - महापौर

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स