LIVE : नागपूरमध्ये कोरोनाचा प्रकोप, 24 तासात 6 जणांचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 02, 2021, 17:03 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:56 (IST)

    वाशिम - पोहरादेवीतील कोरोना रुग्णसंख्या 45
    25 तारखेला 8 जणांना झाली होती लागण
    राठोडांच्या शक्तिप्रदर्शनात जमलेले हजारो समर्थक
    आरोग्य विभागानं घेतले 247 नागरिकांचे नमुने
    मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन -डॉ.अविनाश आहेर

    19:48 (IST)

    राज्यात दिवसभरात 7,863 नवे रुग्ण
    राज्यात दिवसभरात 6,332 रुग्ण बरे
    राज्यात दिवसभरात 54 रुग्णांचा मृत्यू
    रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.89 टक्के
    राज्यात सध्या 79,093 ॲक्टिव्ह रुग्ण

    19:36 (IST)

    बीड - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शांताबाई राठोडांविरोधात परळी शहर पोलिसात तक्रार दाखल, पूजाचे वडील लहुदास चव्हाणांनी केली तक्रार दाखल, 5 कोटी घेतल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा तक्रारीत उल्लेख

    19:20 (IST)

    अनिल परबांनी विरोधी पक्षनेता आणि सभागृहाचा अपमान केल्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप, माफी मागेपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, भाजप आणि मित्रपक्षाची भूमिका मांडत कामकाजावर टाकला बहिष्कार

    19:9 (IST)

    संगणक परिचालक घुसले मंत्र्याच्या बंगल्यात
    मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यात घुसले
    आझाद मैदानात 9 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन
    किमान वेतन द्या, या मागणीसाठी आंदोलन
    सर्व आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    18:59 (IST)

    कोल्हापुरात भरदिवसा भरली जात पंचायत
    प्रेमविवाह निवाड्यासाठी जात पंचायत
    मुलीवर दबाव टाकल्याची माहिती -सूत्र
    मुलगी पुण्यातील असल्याची माहिती
    कोल्हापुरातील मुलानं केला विवाह
    इच्छा नसतानाही घटस्फोटासाठी दबाव -सूत्र

    18:14 (IST)

    'पुण्यात लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळणार'
    'आता 40 खासगी रुग्णालयांतूनही केंद्र उभारणार'
    'प्रतिडोस 150 रुपयांप्रमाणे पालिकेमार्फत लसपुरवठा करणार'
    पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांची माहिती

    17:54 (IST)

    विधान परिषदेत विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार
    आमदारांची विधानभवनच्या पायऱ्यांवर निदर्शनं
    राज्यपाल अभिभाषणावर चर्चा करत होतो -दरेकर
    'माझं भाषण सरकारी पक्षाला सहन झालं नाही'
    विरोधी पक्षनेत्याचं भाषण कॉपीपेस्ट -प्रवीण दरेकर
    'दुसऱ्या सदस्याला भाषण करायला देणं हा माझा अपमान'

    17:48 (IST)

    राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही -कृषीमंत्री भुसे

    16:45 (IST)

    पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली
    पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांची अनोखी शक्कल
    साताऱ्यातील सासवडजवळ पाडलं भगदाड
    मुंबई-पुणे-सोलापूर 223 किमीची पाईपलाईन
    हजारो लीटर पेट्रोलचा जमिनीत झाला निचरा
    पेट्रोल जमिनीत मुरल्यानं 2 विहिरी भरल्या

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स